भंडारा-गोंदियात प्रशांत पडोळे आघाडीवर, पडोळे महायुतीच्या मेंढेंचा पराभव करणार?
Bhandara-Gondia Lok Sabha : राज्यातील अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आघाडी घेतली आहे. विदर्भातील भंडारा-गोंदिया लोकसभा Bhandara-Gondia Lok Sabha) निवडणुकीच्या सुरूवातीच्या कलांमध्ये महाविकास आघाडीचे प्रशांत पडोळे (Prashant Padole) हे आघाडीवर होते. मात्र, आता सुनील मेंढेंनी (Sunil Mende) पडोळेंचा लीड तोडला होता. त्यांनी 119 मतांनी आघाडीवर घेतली होती. मात्र, आता पुन्हा पडोळेंनी आघाडी घेतली आहे.
भंडारा-गोंदियामध्ये महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्यात लढत होत आहे. सुनील मेंढे यांना उमेदवारी मिळण्यास काहीसा विलंब झाला, त्यांच्या कामाबाबत लोकांमध्ये नाराजी असल्याची चर्चा होती. मात्र, भाजप नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला होता. आतापर्यंत भाजपचे सुनील मेंढे यांना
1 लाख 72 हजार 790 मते मिळाली असून दीड हजार मतांनी पिछाडीवर आहेत. तर प्रशांत पडोळे यांना 1 लाख 74 हजार 479 मते पडली असून त्यांनी 1689 मतांना आघाडी घेतली आहेत.
पंचवीस वर्षानंतर काँग्रेसने हसन लोकसभा मतदारसंघ खेचून आणला; प्रज्वल रेवण्याचा दारूण पराभव
काही टप्प्यात कमी-अधिक प्रमाणात आघाडीवर असलेले महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे आता मागे पडले आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीच्या शेवटच्या फेरीपर्यंत काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात प्रशांत पडोळेंसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी तर सुनील मेंढे यांच्यासाठी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी जोर लावला आहे. भंडारा-गोंदिया हा प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले या दोघांचा मतदारसंघ असल्याने विदर्भाचे नव्हे तर महाराष्ट्राचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे.
नाना पटोले यांनी निवडणूक न लढवण्याच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी देण्यात आली. दरम्यान, या मतदारसंघात पडोळे कॉंग्रेसला यश मिळवून देतील का, हेच पाहणं महत्वाचं आहे.