मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे विरोधकांना जाऊन मिळाले : जे.पी. नड्डा
चंद्रपूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे विरोधकांबरोबर जाऊन मिळाले. अशा लोकांना तुम्ही माफ करणार आहात का? असा सवाल चंद्रपूर येथे आयोजित जाहीर सभेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डी यांनी उपस्थितांना विचारला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव बंद केले. याचे मला आश्चर्य वाटते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे संपूर्ण आयुष्यभर ज्यांच्या विरोधात लढले, त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे जाऊन बसले. त्यामुळे त्यांना चांगलाच धडा मिळाल्याची जोरदार टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केली.
त्याचवेळी आज मंदीच्या काळातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाची अर्थव्यवस्था पुढे चालली आहे. अमेरिकेत, युरोपमध्ये लसीकरण अद्यापही पूर्ण झालेलं नाही पण आपल्या भारत देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली लसीकरण पूर्ण केलं. त्याचबरोबर 100 पेक्षा जास्त देशांना भारतानं कोरोना लसीचा पुरवठा केला, त्यातील 48 देशांना मोफत लसीचा पुरवठा केला. त्यामुळं आता भारत घेणारा देश राहिला नसून देणारा देश बनल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी सांगितले. ते चंद्रपूर येथील आयोजित जाहीर सभेत बोलत होते.
भारत देशात विविध लसींना येण्यासाठी अनेक वर्ष जावे लागले. पण कोरोना काळात काही महिण्यांमध्येच दोन-दोन लसी तयार करुन जगाला दिल्या असेही यावेळी नड्डा यांनी सांगितले. त्याचबरोबर ज्यावेळी युक्रेन-रशिया युद्ध सुरु होतं, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच वेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना फोन करुन सांगितलं तर दुसरीकडं युक्रेनचे झेलन्स्की यांना फोन करुन सांगितलं. त्यानंतर आपल्या देशातील तरुणांना भारत देशात आणल्याचेही यावेळी जे.पी नड्डा यांनी सांगितले.
यावेळी राज्यभरामध्ये सुरु असलेल्या रस्त्यांच्या विकासाबाबत बोलताना त्यांनी राज्याच्या विविध भागात सुरु असलेल्या रस्त्यांची उदाहरणं दिली. त्याचबरोबर विदर्भासह राज्याच्या विविध भागामध्ये सुरु असलेल्या विकासावर प्रकाश टाकला.