CM Eknath Shinde यांच्या कार्यक्रमात गोंधळ
वाशिम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या उपस्थितीत रविवारी पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण (Unveiling of the statue of Sant Sewalal Maharaj)करण्यात आलं. या कार्यक्रमाला सोहळ्याला स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, हा कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा बराच उशीरा सुरु झाला. त्यामुळं मंडपात बसलेल्या लोकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यानं पोलीस (Police)बंदोबस्तही अपुरा पडला. त्यामुळं एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता होती. हे लक्षात घेऊन राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod)यांच्या पत्नीनं सर्व सूत्रं हातात घेतली.
शितल राठोड यांनी पोलिसांबरोबर गर्दीत शिरुन लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्या सभामंडपात जागोजागी फिरुन सर्वांना शांत राहण्याचे आवाहन करत होत्या. यावेळी शितल राठोड या बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशभूषेत होत्या. त्यांनी गर्दीत शिरुन परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या सगळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
प्रचंड गर्दीमुळं पोलिसांचा बंदोबस्त अपुरा पडला. त्यामुळं सभास्थळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांनी अपुऱ्या आयोजनाबद्दल बंजारा समाजाची माफी मागितली. मात्र, या सर्व घटनेनंतरही लोकांचा गोंधळ थांबायला तयार नव्हता. आयोजकांनी वारंवार विनंती करुनही लोक ऐकायला तयार नव्हते. सभेला उशीर झाल्यानं अनेकजण सभामंडपातून उठून जाताना पाहायला मिळाले.
Sambhajiraje Chatrapati : कोश्यारींना हटवणे म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण!
बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सेवा ध्वज अनावरण व संत सेवालाल महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आज संजय राठोड यांच्याकडून आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पोहोचण्यासाठी उशीर झाल्यानं कार्यक्रम सुरू होण्याआधीच अनेक बंजारा बांधव हे सभागृहावरून जात असल्याचे पाहायला मिळाले. सभा सुरू झाल्यानंतरही मुख्यमंत्र्यांचं स्वागत होत असताना बंजारा समाजाच्या भगिनी कार्यक्रम स्थळावरून उठून जात होत्या. सभा सुरू असताना उठून जाणाऱ्यांना पोलिसांनी मुख्य गेटवर अडवल्यामुळं 100 ते 150 समाजबांधव पुन्हा सभास्थळी परत आले.