Marathi Sahitya Sammelan: आमच्यात देखील स्क्रिप्ट लिहिणारे साहित्यिक, फडणवीसांचा मिश्किल टोला

Marathi Sahitya Sammelan: आमच्यात देखील स्क्रिप्ट लिहिणारे साहित्यिक, फडणवीसांचा मिश्किल टोला

वर्धा : राजकारणी लोक साहित्यिकांची प्रेरणा आहेत. आम्ही नसलो तर साहित्यिकांना काम उरणार नाही. आमच्यात देखील साहित्यिक लोक आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासून आमच्यातलं साहित्य ओसंडून वाहतं, असा मिश्किल टोला ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) व्यासपीठावरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लागवला.

काही लोकांना प्रश्न पडतो की साहित्याच्या व्यासपीठावर आम्ही इतके राजकारणी काय करतो? त्यांचा हा प्रश्न योग्यच आहे. त्यावर माझं उत्तर हेच आहे की आम्ही राजकारणी अनेक साहित्यकांची प्रेरणा आहोत. आम्ही नसलो तर व्यंगचित्रकारांना काही काम उरणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आमच्यातही अनेक साहित्यिक आहेत. आमच्यात शिघ्र कवी, यमक जुळवणारे, स्क्रिप्ट लिहिणारे आहेत, स्टोऱ्या तयार करणारे लोक आहेत. तुम्ही सकाळी टिव्ही लावला की आमच्यातलं साहित्य ओसंडून वाहताना आपल्याला पहायला मिळतं, असा मिश्किल टोला देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना लागवला.

त्यामुळे कदाचित साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर थोडी जागा आम्हालाही मिळते. थोडी जागा मिळाली की ती व्यापून कशी टाकायची हे आम्हाला माहिती आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

स्वतंत्र्याच्या अगोदरपासून विदर्भ साहित्य संघ आणि मराठी साहित्य परिषद या संस्थांनी साहित्य क्षेत्राला आणि मराठी भाषेचं संवर्धन केलं आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

वर्धा नदीच्या किनारी हे साहित्य संमेलन आयोजित केलं आहे. एकीकडे महात्मा गांधी आणि दुसरीकडे भूदान चळवळीचे विनोबा भावे यांच्या नगरीत हे संमेलन होतंय. अहिंसेची भूमी आणि भूदानची भूमी असा हा संगम आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube