“आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेऊ”; भाजप प्रवेशाच्या चर्चांवर राणांचं सूचक वक्तव्य

“आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेऊ”; भाजप प्रवेशाच्या चर्चांवर राणांचं सूचक वक्तव्य

MP Navneet Rana Comment on Join BJP : लोकसभा निवडणुका जवळ येत असताना (Lok Sabha Election) अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. राणा भाजपाच्या पाठिंब्यावर खासदार असल्या तरी त्यांना यंदाची निवडणूक सोपी नाही. जात प्रमाणपत्र, शिंदे गटाचा मतदारसंघावरील दावा, आमदार बच्चू कडूंबरोबरील (Bacchu Kadu) राणा दाम्पत्याचा वाद, अमरावती जिल्ह्याती स्थानिक लोकप्रतिनिधींशी वाद  या कारणांमुळे त्यांची खासदारकीची वाट खडतर झाली आहे. अशातच आता नवनीत राणा यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. या चर्चांवर राणा यांनी सूचक वक्तव्य केले आहे. आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेत असतो, असे वक्तव्य खासदार राणा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.

पाच कारणे… लोकसभेला अमरावतीमध्ये नवनीत राणांचा गेम होणार!

खासदार राणा पुढे म्हणाल्या, भाजपमध्ये जाण्याबाबत मी आणि रवी राणांची नेहमीच चर्चा होत असते. आम्ही बोललो तरी चर्चेत असतो आणि नाही बोललो तरीही चर्चेत असतो. आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेत असतो.

शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ आणि नवनीत राणा अमरावती मतदारसंघातून इच्छुक आहेत. या मतदारसंघावर शिंदे गटाने दावा केला आहे. याआधी या मतदारसंघातून शिवसेनेचाच खासदार निवडून आला आहे. मागील निवडणुकीत मात्र राणा यांनी विजय मिळवला होता. अशात आता राजकारण सोडावं लागलं तरी चालेल पण मी नवनीत राणा यांच्या प्रचाराला जाणार नाही, असे अडसूळ यांनी ठणकावून सांगितले होते. यावर राणांनी प्रत्युत्तर दिले. आम्ही एनडीएसोबत आहोत त्यामध्ये नवल वाटण्यासारखं काही नाही. कोण काय बोलतं यावर मी बोलणार नाही. कोण राजकारण सोडेल हा माझा विषय नाही, असे राणा म्हणाल्या.

खासदार नवनीत राणा सहा महिन्यात जेलमध्ये दिसतील, प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

दरम्यान, नवनीत राणा यांनी 2014 राष्ट्रवादीच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवली. तर 2019 मध्ये त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवली. त्यांनी निवडून आल्यानंतर काहीच महिन्यात भूमिका बदलून त्यांनी भाजपसोबत जाण्याचे पसंत केले. आताही विरोधी पक्षातील दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करत असताना अद्यापही त्यांचा भाजप प्रवेश झालेला नाही. त्यामुळे त्या भाजपचा पाठिंबा मागू शकतात. पण भाजपच्या निष्ठावंतांसाठी राणा यांना पाठिंबा देणे भाजपच्या निष्ठावंतांना मंजूर नसल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात राणा दाम्पत्य काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube