नाराज बच्चू कडूंना शिंदे-फडणवीस देणार मोठं गिफ्ट? बावनकुळेंनी सांगितलं मनातलं

नाराज बच्चू कडूंना शिंदे-फडणवीस देणार मोठं गिफ्ट? बावनकुळेंनी सांगितलं मनातलं

Chandrashekhar Bawankule on Bacchu Kadu : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये बंड करून दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र या राजकीय भूकंपाचे सत्तेत आधीपासूनच सहभागी असलेल्या शिंदे गटाला जबरदस्त हादरे बसले आहेत. शिंदे गटाच्या काही आमदारांनी नाराजी स्पष्टपणे बोलूनही दाखविली आहे. यामध्ये आमदार बच्चू कडूही (Bacchu Kadu) आहेत. या घटनांमुळे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, या चर्चा निराधार असून कडू नाराज नाहीत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी म्हटले आहे.

NCP : साहेबांनंतर आता दादांनीही दंड थोपटले, दिलीप वळसे-पाटलांसाठी बनले ढाल…

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांनी आमदार बच्चू कडू नाराज असल्याचे विचारले. त्यावर बावनकुळे म्हणाले, नाराजी वगैरे काही नसते. व्यक्ती म्हटल्यावर थोडं वाईट वाटतचं. शेवटी कडू सुद्धा आधी मंत्री होते पण, आता नाहीत त्यामुळे वाईट वाटणारच. त्यांची भूमिका चुकीची नाही. कालांतराने निर्णय होतील. त्यांच्या म्हणण्यावर या सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. येथे त्यांचे चांगले स्थान आहे जे महाविकास आघाडीत नव्हते. त्यामुळे आगामी काळात बच्चू कडूंना काही ना काही जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील, असे बावनकुळे म्हणाले.

तसे पाहिले तर फक्त बच्चू कडूच नाही तर आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले, संजय बांगर हे सुद्धा आमदार नाराज आहेत. याशिवाय आणखीही काही आमदार आहेत ज्यांनाही वाटतंय की आम्हाला मंत्रीपद मिळावं. मात्र, अजित पवार गटाच्या एन्ट्रीने साराच खेळ बिघडल्याचे दिसत आहे. अजित पवार यांच्याबरोबर ज्यांनी शपथ घेतली त्यांना मंत्रीपदे द्यावी लागणार आहेत. दुसरीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेलाच आहे. त्यातच शिंदे गटाच्या आमदारांचा रोष सातत्याने वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत भाजप काय मार्ग काढणार, कुणाला काय मंत्रीपद मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

CM शिंदेंचे नाराज आमदारांना 5 मेसेज; ‘वर्षा’वरील बैठकीत काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी

समीरजीत घाटगे भाजपातच, संभ्रम करू नका 

समरजीत घाटगे यांच्या रक्तात भाजपा असणारा कार्यकर्ता आहे. असा निष्ठावंत कार्यकर्ता व नेता असल्यावर काहीही प्रसंग आला, तरीही ते कधीच पक्षापासून फारकत घेऊ शकत नाही. पक्षाची विचारधारा पाळणारा तो कार्यकर्ता असल्याने त्यांच्याबद्दल संभ्रम करु नये, असे बावनकुळे यांनी म्हटले. यानंतर स्वतः घाटगे यांनी प्रसारमाध्यमांसमोर भूमिका जाहीर केली. मी भाजपात राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube