Amravati Graduate Constituency : मतमोजणीचा तिढा कायम! मविआचे धीरज लिंगाडे यांची विजयाची घोडदौड…

Amravati Graduate Constituency : मतमोजणीचा तिढा कायम! मविआचे धीरज लिंगाडे यांची विजयाची घोडदौड…

अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची अद्यापही मतमोजणी सुरु आहे. मागील 26 तासांपासून मतमोजणी सुरु असून आत्तापर्यंत 2 हजार 366 मतांनी महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे (Dhiraj Lingade) आघाडीवर आहेत.

तर भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील पिछाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. डॉ. रणजित पाटील यांना आत्तापर्यंत 43 हजार 632 मते मिळाली आहेत. रणजित पाटील पिछाडीवर तर धीरज लिंगाडे यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे.

या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. पाटील यांच्या मागणीनंतर निवडणूक आयोगाने त्यांची मागणी मान्य करीत फेर मतमोजणी सुरु केली होती.

मात्र, ही फेर मतमोजणीची मागणी डॉ. रणजीत पाटील यांच्या अंगाशी आलीय. एकूण 8 हजार अवैध मतांपैकी धीरज लिंगाडे यांना केवळ 32 मते मिळाली होती. लिंगाडे यांची ही 32 अवैध मते बाद ठरली आहेत.

तर रणजित पाटील यांना या 8 हजार अवैध मतांपैकी 4500 ते 5000 अवैध मते मिळाली. त्यामुळे पाटील यांची ही अवैध मते बाद करण्यात आली आहे. या निकालामध्ये एकूण 1 लाख 2 हजार 587 मतांपैकी एकूण 8 हजार 735 मते अवैध ठरल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, निवडणुकीसाठी एकूण ४९.६७ टक्‍के मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला होता. पहिल्‍या पसंतीच्‍या मतमोजणीत कोटा पूर्ण न झाल्‍यास निकालाला आणखी विलंब होण्‍याची शक्यता आहे. मतमोजणीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube