शेवटच्या वर्षात तरी परिस्थिती बदलेल!, ‘त्या’ रस्त्यावरुन राणा दाम्पत्यांला नेटकऱ्यांचा सवाल

  • Written By: Published:
WhatsApp Image 2023 03 07 At 2.28.06 PM

अमरावती : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत असतात. कधी चुलीवर भाकरी थापताना तर कधी क्रिकेटच्या मैदानात तर कधी डान्सचे व्हिडिओ व्हायरल (Viral video) होत असतात. सध्या धुलिवंदन सुरु आहे. यानिमित्त मेळघाटमध्ये (Melghat) पाच दिवस चालणाऱ्या होळी उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी राणा दाम्पत्य एका टूव्हिलरवरुन चालले होते. पण ते ज्या रस्त्यावरुन चालले होते त्या रस्त्याची मोठी दुरवस्था झालेली आहे. यावरुनच राणा दाम्पत्य सोशल मीडियावर चांगले ट्रोल झाले आहे.

ज्येष्ठ पत्रकार तुळसीदास भोईटे म्हणतात, ‘सध्या राणांचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय. पण बातमी बाईकवर नाही बाईकच्या चाकांखाली आहे! रस्त्याची अवस्था!! अपेक्षा आहे, राणा दांपत्य आता गल्ली ते दिल्ली सत्ता हाती असताना, शेवटच्या वर्षात तरी ही परिस्थिती बदलतील!’,असे कॅप्शन दिले आहे.

हे देखील वाचा
Eknath Shinde : कुटुंबियांसमवेत मुख्यमंत्री शिंदे यांनी साजरी केली धुळवड..

अमरावती जिल्ह्यात अदिवासी समाज मोठ्या संख्येने राहतो. आजही अनेक गावांना प्राथमिक सुविधा देखील मिळालेल्या नाहीत. राणांच्या त्या व्हिडिओवर एका व्यक्तीने लिहिले की, ‘समस्या रस्त्याची आहे, सिंचनाची आहे, शेतीला वन्य प्राण्यांपासून संरक्षणाची आहे, सर्वात मोठी समस्या तर राणा स्वतः आहे. खोटे कागदपत्रे दाखवून वंचितांची आरक्षित जागा गिळंकृत केलीय बाईंनी. सध्या सरकारच्या आश्रयाने तारीख पे तारीख मिळवत आहे फक्त, अशा प्रकारे राणा दाम्पत्यांवर टीका केली जातीय.

दुसऱ्या व्यक्तीने वाहतूक नियमांवर बोट ठेवले आहे. गाडी चालवताना आमदार रवी राणांनी हेल्मेट घातलेले नाही. यावर एक युजर लिहितो, ‘दोन्ही व्यक्ती भारताच्या संविधानिक सदनाचे सदस्य. खरं तर जबाबदार नागरिक म्हणून यांनी लोकांना वाहतुकीचे नियम सांगायला पाहिजेत परंतु तसं न करता हेल्मेटचा वापर न करता बाईक चालवून वाहतूक नियमांच उल्लघंन केलं. कायदा सर्वांना समान पाहिजे!’

नवनीत राणा अपक्ष खासदार असल्यातरी सध्या भाजपशी जवळीक ठेऊन आहेत. आमदार रवी राणा भाजप समर्थक आमदार म्हणून ओळखले जातात. एक युजर म्हणतो, ‘राणा मॅडम रस्ते तरी नीट करायला पाहिजे होतं. तुम्ही खासदार, तुमचा मिस्टर आमदार दोघं मिळून करायला पाहिजे होतं. सबका साथ, सबका विकास मग महाराष्ट्र मागं का राहतोय?

Tags

follow us