तुम्हाला किंमत चुकवावी लागेल; मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांची पत्रकातून धमकी

तुम्हाला किंमत चुकवावी लागेल; मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांची पत्रकातून धमकी

गडचिरोली – अहेरी विधानसभेचे आमदार धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची साथ देत अन्न व औषध प्रशासन मंत्रीपद मिळवले. त्यानंतर 5 जुलै रोजी नक्षलवाद्यांनी एक पत्रक प्रकाशित केले असून सूरजागड येथील लोहखाणीला खाणीला धर्मरावबाबा देत असलेल्या उघड समर्थनावरून जोरदार टीका केली. तसेच तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना तुमच्या कृत्याची किंमत चुकवावी लागेल, असं नमूद करत धमकीही दिली आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. (Naxalites again threaten Minister Dharma Rao Baba Atram over proposed mine)

https://www.youtube.com/watch?v=YvWYxKSfwwg

विशेष म्हणजे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना गेल्या हिवाळी अधिवेशनात लोह प्रकल्पावरून माओवाद्यांकडून धमकी देण्यात आली होती. आता पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा नक्षलवाद्यांचे एक पत्रक मीडियात व्हायरल झाले आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) वेस्टर्न सब-झोनल ब्यूरोचे प्रवक्ते श्रीनिवास याने दोन पानी पत्रक काढून धर्मरावबाबांवर टीका केली आहे. सूरजागड लोहखाणीला विरोध अधिक तीव्र करा, असं आवाहन करून या प्रकल्पासह प्रस्तावित सहा लोह उत्खनन प्रकल्पांविरोधात नक्षलवादी उभे असल्याचे म्हटले आहे. आत्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आदिवासींचे जंगल, जमीन उद्धवस्त केल्याची किंमच चुकवावी लागेल, असा इशाराही या पत्रकातून देण्यात आला आहे.

मृतांची संख्या वाढली! 48 कुटुंबं जमीनदोस्त, 100 जण मातीच्या ढिगाऱ्याखालीच, CM शिंदेंनी ठोकला तळ 

आत्राम यांनी घराण्यांची दलाली चालवली असल्याचा आरोप केला. इथं विकासाच्या नावाखाली ग्रामसभांच्या अधिकारांची पायमल्ली करून त्यांच्या परवानगीशिवाय लोहखनिज उत्खनन केले जात आहे. तोडगट्टा येथील आंदोलनाला माओवाद्यांचा पाठिंबा असल्याचे सांगून पोलीस प्रशासन आंदोलनाची बदनामी करत आहे. येथील आंदोलकांची धर्मरावबाबा आत्राम यांनी भेट घेतली. पण ते खाण कंपन्यांना पाठिंबा देत आहेत. त्यामुळे लोक धडा शिकवतील. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर तोडगट्टा येथे सुरू असलेले खाणकाम विरोधी आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहनही या पत्रकात करण्यात आले आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांचे हे धमकीचे पत्र पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घेतले असून याप्रकरणी तपास पोलीस करत आहेत.

धमक्यांना घाबरत नाही-

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना मिळाली आहे. सूरजागड प्रकल्पामुळे हजारो हातांना रोजगार मिळाला आहे. या प्रकल्पामुळे अनेक घरांमध्ये चुली पेटत आहेत. लोकांचे जीवनमान उंचावत आहे. जिल्ह्याचा विकास हेच माझे ध्येय आहे. त्यामुळे अशा धमक्यांना मी घाबरत नाही आणि लक्षही देत नाही, असं असे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube