अजितदादांच्या राष्ट्रवादीत चाललंय काय; हसन मुश्रीफांनी वाशिमचं पालकमंत्रिपद सोडलं?

अजितदादांच्या राष्ट्रवादीत चाललंय काय; हसन मुश्रीफांनी वाशिमचं पालकमंत्रिपद सोडलं?

Hasan Mushrif : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोडली आहे. वाशिमच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी हसन मुश्रीफ यांना देण्यात आली होती. महायुतीत नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यावरील धुसफूस अजून थांबलेली नाही. यातच आता मुश्रीफांना पालकमंत्रिपद सोडल्याची बातमी आली आहे. त्यामुळे राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

धनंजय मुंडेंचं गलिच्छ स्टेटमेंट..100 लोक गायब, सीडीआर का काढले जात नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल

राज्य मंत्रिमंडळात मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खात्याची जबाबदारी आहे. यानंतर त्यांना वाशिमच्या पालकमंत्रिपदाचीही जबाबदारी देण्यात आली होती. परंतु, आता पालकमंत्रिपद सोडण्याची इच्छा त्यांनी दर्शवली असून याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्याचीही माहिती आहे. त्यामुळे आता जर मुश्रीफांची इच्छा अजित पवार यांनी पूर्ण केली तर वाशिमच्या पालकत्वाची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न आहे.

राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री दत्ता मामा भरणे यांना अजून कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्री केलेले नाही. त्यामुळे आता कदाचित वाशिम जिल्ह्याची जबाबदारी त्यांना मिळू शकते. जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. परंतु, अजित पवार दत्ता भरणेंनाच संधी देतात की आणखी कुणाला हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये धुसफूस सुरु असतानाच कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी संधी न मिळाल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची नाराजी लपून राहिलेली नाही. (Washim) कोल्हापूरचे पालकमंत्री शिवसेनेकडे गेलं असून सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे आहे. त्यामुळे आबिटकरांच्या निवडीवर मुश्रीफांची नव्हे, तर शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांचीही नाराजी लपून राहिलेली नाही.

धनंजय मुंडेंनी माझ्यावर आवाज वाढवला होता; ‘त्या’ भेटीचा उल्लेख करत धसांनी काय सांगितलं?

हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरपासून थेट वाशिम जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु, ते या पदाबाबत फारसे उत्सुक नाहीत. 26 जानेवारीनिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमासाठी हसन मुश्रीफ वाशिमला पोहोचले होते. मात्र, शासकीय ध्वजरोहणाचा कार्यक्रम पार पडताच कोणतीही बैठक न घेता त्यांनी थेट पुन्हा कोल्हापूर गाठले होते. त्यामुळे मुश्रीफ नाराज असल्याची चर्चा तेव्हाही राजकीय वर्तुळात रंगली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube