पुन्हा जलकुंभी वाढली, मोर्णेचे सौंदर्यीकरणाकडे लोकप्रतिनिधींची पाठ; डीपीआरला मंजुरी नाहीच

पुन्हा जलकुंभी वाढली, मोर्णेचे सौंदर्यीकरणाकडे लोकप्रतिनिधींची पाठ; डीपीआरला मंजुरी नाहीच

Morna River : अकोला शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मोर्णा नदीचे (Morna River) सौंदर्यीकरणाचे स्वप्न वर्षानुवर्षे दाखविले जात आहे. अनेकवेळा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, मात्र सध्या मोर्णा नदीला अस्वच्छतेने वेढले आहे. नदीच्या पात्राभोवती जलकुंभी पसरली असून भूमिगत गटार योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित न झाल्याने शहरातील घाण सांडपाणी नाल्याद्वारे नदीत सोडले जात आहेत. नदीच्या सुशोभीकरणाची योजना केंद्र शासनाकडे (Central Govt)अडकली असून महापालिका सुद्धा जलकुंभी काढण्याची तसदी घेत नसल्याची परिस्थिती आहे. (Neglect of the people’s representatives and the municipal corporation towards the beautification of the Morna river, the DPR is not approved)

मोर्णा नदीच्या स्वच्छतेकडे महापालिका प्रशासनाने यापूर्वीच पाठ फिरविली आहे. शहरातील घाण सांडपाणी नदी पात्रात जाऊ नये, यासाठी भूमिगत गटार योजनेचा पहिला टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. शहरातून वाहणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी दोन ठिकाणी एसटीपी प्लांट उभारण्यात आले असून ते कार्यान्वित झाले आहेत. पहिला प्लांट शिलोडा येथे असून दुसरा पीकेव्हीमध्ये आहे. शिलोडा येथील प्लांटमध्ये घाण सांडपाणी वाहून नेण्यासाठी मोर्णा नदीच्या काठावरून मलजल वाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र यानंतरही हद्दवाढ भाग व शहरात भूमिगत गटार योजना उभारण्यात न आल्याने शहरातील घाण सांडपाणी थेट मोर्णा नदीपात्रात जात आहे.

विद्यार्थीनीचे प्राण वाचवणाऱ्यांना शाबासकी, जितेंद्र आव्हाडांनी जाहीर केलं मोठं बक्षीस 

मोर्णा नदीचे सुशोभीकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाकडून आराखडा तयार करण्यात आला होता. या प्रकल्पाचा डीपीआरही तयार केला होता. या डीपीआरला राज्यस्तरावर मंजुरी मिळाल्यानंतर केंद्र सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा असून मंजुरी प्रक्रियेतच आठ ते दहा वर्षे उलटली आहेत. अशा स्थितीत सुशोभीकरणासाठी किती वर्षे लागतील, हे सांगता येत नाही. महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधीही मोर्णा नदीच्या स्वच्छतेबाबत उदासीन असल्याची परिस्थिती आहे. परिणामी मोर्णा नदीला पुन्हा जलकुंभीने वेढले आहे.

दरम्यान तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मोर्णा नदीपात्राच्या सौंदर्यीकरणासाठी प्रयत्न केले होते. मात्र, देखभाल व दुरुस्तीअभावी या सौंदर्यीकरणाची वाट लागली असून महापालिका प्रशासनही याकडे ढुंकूनही पहायला तयार नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube