आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर पोलिसांचा लाठीमार; Ravikant Tupkar यांचा आरोप

आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर पोलिसांचा लाठीमार; Ravikant Tupkar यांचा आरोप

बुलढाणा : कापसासह (cotton) सोयाबीन (soybean) आणि पीक विम्याच्या (Peek Vima) प्रश्नांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तुपकर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. या आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा दावा रविकांत तुपकर यांनी केला आहे.

Modi Govt : एका झटक्यात 13 राज्यपाल बदलले

तत्पूर्वी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी 11 फेब्रुवारीला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. या आंदोलनाच्या वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकारावर सुद्धा पोलिसांनी लाठीमार केला.

या घटनेनंतर पोलिसांनी तुपकर यांना ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात आणले होते. यावेळी पोलिसांनी पत्रकारांना सुद्धा ठाण्यात जाण्यासाठी मज्जाव केला. पोलिसांच्या या भूमिकेचा निषेध करत बुलढाणा शहर पोलीस ठाण्यासमोर पत्रकारांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

नेमकं प्रकरण आहे तरी काय?
विदर्भातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाहीये. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गेल्या अनेकवेळा आंदोलन करण्यात आली. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या जलसमाधी आंदोलनाची दखल सरकारने घेतली होती. त्यानंतर शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळेल अशी अपेक्षा असताना पुन्हा एकदा शेतकऱ्यांची निराशा झाली. यामुळे संतापलेले रविकांत तुपकर आक्रमक झाले. व त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube