‘मंदिरातील पुजारी विद्यापीठातून..,’; हिंदुंना एकत्र आणण्यासाठी आंबेडकरांचा RSS ला सल्ला

‘मंदिरातील पुजारी विद्यापीठातून..,’; हिंदुंना एकत्र आणण्यासाठी आंबेडकरांचा RSS ला सल्ला

Prakash Ambedkar : देशातल्या मंदिरातील पुजारी विद्यापीठातून पदवीधर असावा, हा कायदा करा मग तो पुजारी कोणत्याही जातीचा चालेल, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिला आहे. दरम्यान, नागपुरात आज मनस्मृती दिनानिमित्त आयोजित स्त्रीमुक्ती दिन परिषदेत आंबडेकर बोलत होते. यावेळी आंबेडकरांनी विविध मुद्द्यांवरुन आरएसएस आणि महाविकास आघाडीवर टोलेबाजी केली आहे.

जरांगेंचा वार-भुजबळांचा पलटवार; ‘काही दिवसांनी भुजबळ भजे अन् जिलेबीचे कागदं खाणार’

आंबेडकर म्हणाले, जर देशातील हिंदुना एकत्र आणायचे असेच तर संघाला एक काम करण्याचा सल्ला देतो. संघाने देशात हिंदू धर्मशास्त्र विद्यापीठाची स्थापना करुन एक कायदा बनवला पाहिजे, प्रत्येक मंदिरातील पुजारी विद्यापीठातून पदवीधर असावा हा कायदा तयार करावा. हा पुजारी कुठल्याही जातीचा असो चालेल. हिंदुना एकत्रित करण्यासाठी संघाने माझा हा सल्ला मानावा, असं आंबेडकर म्हणाले आहेत.

आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही आंबेडकरांनी यावेळी टोलेबाजी केलीयं. सरसंघचालक मोहन भागवत यांनाही त्यांच्या भूमीत आंबेडकरांनी सवाल केला आहे. मोदी आमच्या प्रश्नांना उत्तर देत नाही, किमान मोहन भागवतांनी तरी देतील अशी अपेक्षा करत असल्याचं ते म्हणाले आहेत.

Aishwarya Sharma: एक्स बॉयफ्रेंडवर भडकली ऐश्वर्या शर्मा.. म्हणाली ‘लाज वाटली पाहिजे तुला..’

याआधीही आंबेडकरांनी भागवत आणि मोदींना सवाल केले होते. पंतप्रधान मोदी आणि आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांची मागील वर्षभरात कुठे आणि कितीवेळा भेट झाली. या भेटीचं तपशील द्या, अन्यथा तुमची भेट झाली नसल्याचं आम्ही गृहित धरु, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.

मनुची व्यवस्था अन्यायकारक :
देशाच्या संसदेवर पुन्हा मनुवादी व्यवस्था येऊ द्यायची नसेल तर आपल्या विचारांचा ताबा मिळवणं आवश्यक असून मोदींना संपवण्यासाठी कार्यकर्त्यांनी 500 मतदार गोळा करावेत. त्यासाठी कोणासोबत मैत्री ,वेळ प्रसंगी मत विकत घ्यावे लागले तर घ्या, असा सल्लाच प्रकाश आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

…तर मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही :
कोणी म्हणतंय मी 23 जागा लढणार, तर कोणी म्हणतंय अमुक जागा लढवणार. आम्ही त्यांना म्हणतोयं की पहिल्यांदा जागा सोडा. पक्ष वाढवायचा आहे की मोदी घालवायचा आहे? मोदी घालवायचा असेल तर 2-4 जागा कमी आल्या तरी चालतील ही भूमिका असली पाहिजे. नाहीतर आम्हाला एवढ्याच जागा पाहिजेत, अशा भूमिकेवर राहिलात तर मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही, अन् तुम्ही तिहार जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही, अशी टोलेबाजी आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube