विदर्भात अतिवृष्टीमुळे महापुराचा हाहाकार! वीज पडून सात जणांचा मृत्यू, तीनजण बेपत्ता…

विदर्भात अतिवृष्टीमुळे महापुराचा हाहाकार! वीज पडून सात जणांचा मृत्यू, तीनजण बेपत्ता…

Vidarbha Rain Update : विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मागील 48 तासात संपूर्ण विदर्भाला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या पावसात आतापर्यंत सात जणांचा वीज पडून तर एकाचा भींत कोसळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने त्यात तीन जण अद्यापही बेपत्ता आहेत.(Vidarbha heavy rain Huge damage seven dead Three people are missing )

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीसाठी आठवलेही सरसावले, आरपीआयकडून पाच लाखांची मदत जाहीर…

विदर्भात दोन दिवसामध्ये 8 ते 10 हेक्टर शेती अक्षरशः खरडून गेली आहे. विदर्भामध्ये ढगफुटी आणि महापुरामुळे शेतीचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. त्यात यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं आहे. शेती खरडून गेल्यामुळे आता पेरणी करायची कशी? असा मोठा प्रश्न या भागातील शेतकऱ्यांना पडला आहे.

जयंत पाटलांचा कडेकोट बंदोबस्त, अजित पवारांच्या गळाला सांगलीतील एकही आमदार नाही

चंद्रपूर जिल्ह्यात कोपरना तालुक्यात पुराचा हाहाकार पाहायला मिळत आहे. पैनगंगा-वर्धा-झरपटनद्यांना पूर आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मात्र 24 तासांपासून पाऊस बंद झाला आहे. मात्र विविध भागात पाणी साठलेले आहेच.

यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी पुराचं कारण ठरली आहे. वनसडी-अंतरगाव-भोयगाव-धानोरा मार्ग बंद झाला आहे. परसोडा, रायपूर, अकोला, पारडी, कोडशी, जेवरा, पिपरी, वनोजा, सांगोडा, अंतरगाव इरइ, कारवा, भोयगाव भारोसा आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अंतरगाव येथील घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले आहे.

विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. ज्या-ज्या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे त्या जिल्ह्यांमध्ये सुट्टीचा आदेश देण्यात आला आहे. विदर्भातील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. आपत्कालीन परिस्थिती आणि कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube