Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीसाठी आठवलेही सरसावले, आरपीआयकडून पाच लाखांची मदत जाहीर…

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीसाठी आठवलेही सरसावले, आरपीआयकडून पाच लाखांची मदत जाहीर…

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही इर्शाळवाडीत दाखल होत दुर्घटनाग्रस्तांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर इर्शाळवाडी गावाला 5 लाख रुपयांची मदत आरपीआय पक्षाच्यावतीने करण्यात येत असल्याचं रामदास आठवलेंनी जाहीर केलं आहे. इर्शाळवाडीतल्या दुर्घटनाग्रस्तांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

जयंत पाटलांचा कडेकोट बंदोबस्त, अजित पवारांच्या गळाला सांगलीतील एकही आमदार नाही

आठवले म्हणाले, मनाला चटका लावणारी घटना इर्शाळवाडीत घडली असून इर्शाळवाडीतल्या लोकांवर दुख:दायक प्रसंग ओढावला आहे. दुर्घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांच्या वारसांना फक्त घरे न देत त्यांना प्रत्येकी तीन एकर जमीन आणि शासकीय नोकरी देण्याची मागणी रामदास आठवलेंनी केली आहे.

कष्ट टाळू मुख्यमंत्री ते ‘कष्टाळू’ मुख्यमंत्री; पीएम मोदींच्या भेटीनंतर श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

तसेच दुर्घटनाग्रस्त नागरिकांचा प्रश्न फक्त घरे देऊन सूटणार नसून त्यांच्या रोजगाराचाही प्रश्न शासनाला सोडवाला लागणार आहे. त्यामुळेच मी इथल्या तरुणांच्या रोजगारासाठी प्रयत्न करणार असून उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं आहे.

अलिया-रणवीरचा ‘Rockey Or Rani ki Prem Kahani’ चित्रपट संकटात, चित्रपटातील संवादांवर सीबीएफसीची कात्री…

दरम्यान, मनाला चटका लावणारी घटना रायगडच्या इर्शाळवाडी गावात घडलीयं. अतिवृष्टीमुळे डोंगराच्या पायथ्याशी असलेलं इर्शाळवाडी गावावर दरड कोसळ्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला. घटना घडल्यानंतर तत्काळ एनडीआरएफच्या टीमकडून बचावकार्य करण्यात आलं. बचावकार्यात जवळपास 144 लोकांना बाहेर काढण्यात आलं असून 27 जणांचा जीव गेला आहे.

दुर्घटनेला चार दिवस उलटूनही अद्याप काही लोकं मातीच्या ढिगाऱ्याखालीच अडकले असून शासनाकडून बचावकार्य थांबवण्यात आलं आहे. आता इर्शाळवाडीत ज्या लोकांचा थांगपत्ता लागलेला नाही त्यांना मृत घोषित करण्यात येणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube