उमेदवार देतांना भाजपची दमछाक, विदर्भातील पाचही जागांवर कॉंग्रेसच येणार; वडेट्टीवारांचे टीकास्त्र

उमेदवार देतांना भाजपची दमछाक, विदर्भातील पाचही जागांवर कॉंग्रेसच येणार; वडेट्टीवारांचे टीकास्त्र

Vijay Wadettiwar : काल कॉंग्रेसने (Congress) लोकसभेसाठी (Lok Sabha Elections) राज्यातील उमदेवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात प्रतिभा धानोरकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. धानोरकर या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार असतील. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवार (Shivani wadettiwar) यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही होते. धानोरकर यांनाउमेदवारी जाहीर झाल्यानंतर विजय वडेट्टीवार नाराज झाल्याचे समोर येत आहे.

‘आंबेडकरांशी युती नसेल तरीही जिंकणारच’; संजय राऊतांनी थेट सांगून टाकलं 

शिवानी वडेट्टीवार यांना डावलून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळं वडेट्टीवार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. आता वडेट्टीवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. तसा शिवानी देखील होता. शिवानीने उमदेवारी मागितली होती. पण, ती दिली गेली नाही. पक्षाच्या हायकमांडने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. पक्षाचा निर्णय आम्हाला मान्य आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

Government Schemes : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल? 

मुलीला तिकीट न मिळाल्यानं विजय वडेट्टीवार आतात धानोरकर यांच्या प्रचाराला जाणार का, असा सवाल उपस्थित होतोय. त्यावरही वडेट्टीवार यांनी भाष्य केलं. मला शक्य असेल तिथे प्रचारासाठी जाईन. मी काँग्रेसचा नेता आहे. मला महाराष्ट्रभर काम करायचे आहे. पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचाराला जाण्यात कोणताही अडचण नाही. दिल्लीला हादरे देण्याची हिंमत आणि ताकद महाराष्ट्राकडे आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

धानोरकर गडबडीत माझं नाव विसरल्या
वडेट्टीवार म्हणाले, प्रतिभा धानोरकर गडबडीत माझं नाव विसरल्या असतील. नावामुळे फार काही फरक पडत नाही. नाव घेतलं पाहिजे, असं काही नाही. पाचही ठिकाणी माझा वाटा असतो. माझी जिथे गरज आहे, तिथे मी जाईन, असे ते यावेळी म्हणाले.

विदर्भात भाजपची अवस्था बिकट होणार
पुढं बोलतांना वडेट्टीवारांनी भाजपवर जोरदार टीका केली. विदर्भातील पहिल्या टप्प्यातील पाचही लढती काँग्रेससाठी अनुकूल आहेत. या पाच लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला प्रचंड मतांनी विजय मिळणार आहे. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत उमेदवार देतांना भाजपची दमछाक झाली. भाजपला दुसऱ्यांचे उमेदवार पळवावे लागले. भाजपला आता घाम फुटला असून विदर्भात भाजपची अवस्था बिकट होणार आहे, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube