विद्यानंद बापटांनाच पुणेकरांनी डीजेवर नाचवलं; एआय व्हिडीओ व्हायरल

Vidyanand Bapat DJ Dance दहीहंडीच्या निमित्ताने लावलेल्या डीजेवरच विद्यानंद बापटांचा नाचतानाचा एआय व्हिडीओ लावल्याचं पाहायला मिळालं.

Vidyanand Bapat

Vidyanand Bapat DJ Dance : गणेशोत्सवात डीजे वाजवण्यावर बंदी घालण्याची मागणी करणारे विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी डीजेवर बंदी (DJ Ban) घालण्याची मागणी केली म्हणून काही डीजेप्रमी पुणेकरांनी बापटांनाच डीजेवर नाचवलं.

महिन्याला 4 लाख पगार, अडीच लाखांची बचत, तरीही मूल नको; होम लोन कपल्सच्या आनंदावर विरजण?

झालं असं की, विद्यानंद बापट यांनी गणेशोत्सवात लावल्या जाण्याऱ्या डीजेमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदुषणाचा मुद्दा उचलला आणि तो मुद्दा ते मीडियावर मांडत राहीले. त्यांच्या या भुमिकेमुळे त्यांना मारहाणही करण्यात आली. पण आता दहीहंडीच्या निमित्ताने लावलेल्या डीजेवरच विद्यानंद बापटांचा नाचतानाचा एआय व्हिडीओ लावल्याचं पाहायला मिळालं आहे. डीजेला विरोध करणाऱ्या बापटांनाच डीजेवर नाचवल्याने अजूनच जास्त चर्चा होतेय.

‘अशोक खरातच्या पिक्चरच्या शूटिंगमध्ये एक घोटाळा झालाय’; शहाजी बापूंनी सांगितला सांगोल्यातला ‘तो’ किस्सा

तर, दुसरीकेडे प्रसिद्ध संगीतकार, गायक अवधुत गुप्ते यांनी विद्यानंद बापट यांनी मांडलेल्या भुमिकेवर एक गाणंच बनवलं आहे. “तुझ्या सारख्या सरळ माणसाचा ना हा धंदा, विद्यानंदा ओळख इथल्या आनंदी आनंदा” असे या गाण्याचे बोल आहेत. विद्यानंद बापटांवर बनलेलं हे गाणंही आता व्हायरल झालं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Avadhoot Gupte (@avadhoot_gupte)

मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा; सारथी योजनेतून परदेशी शिक्षणाच्या शुल्काची मर्यादा हटवली

दरम्यान, बापट डीजेमुक्त गणेशोत्सवाच्या मुद्द्याला धरुन आहेत. त्यामुळे आता डीजेच्या दणदणाटामध्ये विद्यानंद बापटांच्या ‘डीजेमुक्त गणेशोत्सवाचा’ आवाज ऐकू येतो का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us