Video : पार्थ पवारांवर गुन्हा अन् अजित पवारांचा राजीनामा; दमानिया अन् कुंभार आक्रमक
पुणे मुंढवा जमीन गैरव्यवहारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे दोषीच आहेत असा दावा कुंभार आणि दमानिया यांनी पुन्हा केला.
पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार (Pune) यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. पण राजकीय दबावामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीच्या कोरेगाव पार्क (मुंढवा) येथील 40 एकर जमीन विक्री प्रकरणात विजय कुंभार आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली आहे.
पुढे बोलताना, यापूर्वी पार्थ पवारांच्या सहीचं पत्र दिलं होते. पार्थ पवारांनी तेव्हा सांगितलं, की ते माझ्या सहीचं पत्र नाही. 25 मे 2021 रोजी हा व्यवहार करून दिला आहे. ही सर्व कागदपत्र सरकार दरबारी पडला आहे. गेल्या 5-6 वर्षापासून हा घोटाळा सुरू आहे. एकच नोटरी वकिलाकडून हे बनवून घेतलंय. अजित पवारांना हे सर्व माहीत होतं आणि राज्यातले मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री या प्रकरणात प्रोटेक्ट करत असल्याचा खळबळजनक दावाही कुंभार यांनी केलाआहे.
Video : पुणे मुंढवा भूखंड गैरव्यवहारात पार्थ पवारांचा सहभाग, विजय कुंभार यांनी दिला मोठा पुरावा
ही पावर ऑफ अटॉर्नी आहे, यात मुंढव्याची जागा असून यात प्रत्येक पेजवर पार्थ पवारांची सही आणि त्यांचा फोटो देखील आहे. 2021मध्ये याच जमिनींची पावर ऑफ अटॉर्नी आहे. ॲडव्होकेट तृप्ता ठाकूर यांनी हे पाठवलं आहे. तसंच दिग्विजय सिंह आणि शीतल तेजवानी यांच्या वकिलांनी ही पाठवलं आहे. तिने यात सर्व पाठवलं आहे, यात चाट देखील आहेत असा दावाही त्यांनी केला.
संतोष हिंगणे आणि तृप्ता ठाकूर यांचे यात चॅटिंग आहेत. अजित पवारांचे पीए आणि तृप्ता ठाकूर यांचे चॅटिंग यात आहे. EOW चे अधिकारी आहेत वाघमारे त्यांचा देखील नंबर यात पाठवला आहे. हे सर्व पोलिसांसमोर देखील गेले आहे. तरी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल नाही. जर आज अजित पवार यांचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही उद्या पुण्याला जाऊन त्यांचे नाव घाला असा इशारा देणार आहोत असा आक्रमक पवित्रा यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी घेतला आहे.
शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यात झालेला हा व्यवहार आहे. यात तीन तीन OSD सहभागी आहेत. फक्त दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांना अडकवलं जातंय आणि पार्थ पवार यांच्यावर काहीही कारवाई नाही म्हणून बहुतेक तृप्ता ठाकूर यांनी हे आम्हाला पाठवलंय. कलेक्टरला तो पत्ता तृप्ता ठाकूर पाठवते.
आम्ही जी याचिका दाखल करणार आहोत त्याला पाहिले जबाबदार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे असतील. अजित पवार संत नाहीत ते असे म्हणतीलच की माहित नाही. अजित पवारांचे 3 अधिकारी सामील आहेत. त्यांचं नाव ढाकणे, राम चौबे, संतोष हिंगणे, विकास पाटील यांच्याशी चॅटिंग असल्याचं समोर आलं आहे, असा खळबजनक दावाही अंजली दमानिया यांनी केलाय.
