ललित पाटीलवर सरकारचाच आशिर्वाद; विजय वडेट्टीवार यांचे पुणे, नाशिक पोलिसांवर गंभीर आरोप

ललित पाटीलवर सरकारचाच आशिर्वाद; विजय वडेट्टीवार यांचे पुणे, नाशिक पोलिसांवर गंभीर आरोप

Vijay Wadettiwar On State Government : मुंबई, नाशिक, पुणे शहरात ड्रग्स प्रकरण उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली. नाशिकच्या पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse)यांचे नाव यात जोडले गेल्यानं राजकारणही जोमात सुरु आहे. त्यातच आता ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil)याला मुंबई पोलिसांनी चेन्नईमधून अटक केली. त्यानंतर ललितला मुंबईत आणण्यात आलं. यावेळी मीडियासमोर मी ससून रुग्णालयातून पळून गेलो नाही तर मला पळवण्यात आलं, असा खळबळजनक आरोप त्यानं केला. त्यावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ललित पाटीलवर (Lalit Patil Drugs Case)राज्यातील सरकारचाच आशिर्वाद आहे, त्यामुळे ललितला पकडण्यासाठी एवढे दिवस लागले, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

पहिल्याच आठवड्यात मालदीवमधून भारतीय सैन्य हुसकावून लावणार; मोहम्मद मुइझ्झू यांची घोषणा

वडेट्टीवार म्हणाले की, ललित पाटीलच्या (Lalit Patil Drugs Case)पाठिमागे अदृश्य हात आहेत. ड्रग्ज माफियांचं समर्थन करणाऱ्यांचे यामागे हात आहेत. ड्रग्ज विकून मलिदा खाणारे काही हात यामध्ये आहेत. आमची पूर्वीपासूनच मागणी होती की, त्याला पळवलं गेलं आहे.

MPSC तर्फे 7 हजार 510 पदांची बंपर भरती, महिन्याला एका लाखापर्यंत मिळवा पगार…

तो सरकारच्या आशिर्वादानेच फिरत आहे. त्यामुळेच त्याला पकडण्यासाठी एवढे दिवस लागले. तो महाराष्ट्रातच फिरत होता पण पुण्याचे, नाशिकचे पोलीस काही काम करत नव्हते, असाही आरोप यावेळी वडेट्टीवार म्हणाले.

सरकारचा आणि पुणे पोलिसांचा आशिर्वाद असल्याशिवाय ससून हॉस्पिटलमध्ये धंदा करतो. हॉस्पिटलमधून राजरोसपणे वार्ड नंबर 16 मधून व्यवसाय करतो. पैसे कमवतो, आजारी असल्याचं दाखवून अनेक दिवस तुरुंगात राहण्याऐवजी हॉस्पिटलमध्ये राहतो. तिथून आपला व्यवसाय वाढवतो, हे पोलिसांना कळलं नाही का? त्यामुळे पोलिसांचा यामध्ये हात आहे. हे गृह मंत्रालयाचे अपयश असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

या प्रकरणाचे धागेदोरे हे मंत्रालयापर्यंत आहेत. अनेक मंत्री या ड्रग्ज प्रकरणामध्ये असावेत त्यामुळे या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यामध्ये मंत्री दादा भुसे यांच्यावर थेट आरोप केला जात आहे.

त्यावर वडेट्टीवार म्हणाले की, सरकारमध्ये अंतर्गत वाद आहे. ज्यांना जो माणूस डोईजड होतो त्याला बाजूला करुन त्या ठिकाणी दुसरा माणूस बसवायचा. आणि त्याला अशी प्रकरणं बाहेर काढून त्याला उघडं पाडायचं असाही आरोप यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube