Maratha Reservation : तेलंगणाचं कारण देत आरक्षण लांबणीवर टाकण्याचा डाव; वडेट्टीवारांनी आगीत तेल ओतलं

Maratha Reservation : तेलंगणाचं कारण देत आरक्षण लांबणीवर टाकण्याचा डाव; वडेट्टीवारांनी आगीत तेल ओतलं

Vijay Wadettiwar On Maratha Reservation : आरक्षणाची मुदत संपली असून तेलंगणाचं कारण देत आरक्षण लांबणीवर टाकण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्याच चांगलाच गाजत असताना आता माजी न्यायमुर्ती संदीप शिंदे समितीला सरकारने मुदत वाढवून दिलीयं, त्यावर विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर आरोप केले आहेत. नागपुरातून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, आरक्षणाची मुदत संपली असून तेलंगणाच कारण देऊन आरक्षण लांबणीवर टाकण्याचा डाव आहे. तुम्ही दिलेल्या मुदतीत आरक्षण द्यायला हवं होतं. जरांगे पाटील यांना काय शब्द दिला. तुम्ही दिलेला शब्द मुदतीत पाळायला हवा होता. सरकार पळवाट काढत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा वाद चिघळला; नांदेडात खासदाराच्या गाड्या फोडल्या

ज्यांनी फसवणूक केली त्यांना गाव बंद करा :
मराठा समाज आज ज्या स्टेजवर आहे, तर त्याला कारणीभूत कोण आहे? हे जरांगे पाटलांच्या वक्तव्यावरून समजतयं. तुम्हाला आरक्षण देता येत नव्हत की देता येत होत? मग काय अडचणी होत्या? अडचणी कायमच्या दूर करून निर्णय घ्यायला पाहिजे होता. २०१३-१४ मध्ये कॉंग्रेस हीच आरक्षण देण्याची भूमिका मराठ्यांना स्वीकारली. आमची विनंती आहे की, ज्यांनी तुमची फसवणूक केली त्यांना तुम्ही गावबंदी करा, असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत.

Shastri Viruddh Shastri Trailer Out: ‘शास्त्री विरुध्द शास्त्री’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

माध्यमांशी संवाद साधताना वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर चांगलाच हल्लाबोल चढवल्याचं दिसून आलं आहे. दसरा संपला आणि जाणाऱ्या रावनाने विचारले मला जाळता पण जाळणाऱ्यांपैकी राम कोण? याचं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं तर बरं होईल. ना सरकारमध्ये राम आहे. ना शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना राम दिसतोय, ना धर्मात धर्मात तेढ निर्माण करताना राम दिसत नाही. स्वतःला राम दाखवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करत असतील, तर महाराष्ट्रातील जनतेनं त्यांना कधीच रावण मानायला सुरुवात केली असल्याची खोचक टीकाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलीयं.

‘बाबा महाराज सातारकर देशाचे अनमोल रत्न होते’ : भाषणाच्या सुरुवातीलाच PM मोदींकडून आदरांजली

तसेच पूर्वी लुटारीची टोळी म्हणणारे भाजपचे लोक आता लुटारुंच्या मांडीला मांडी लावून बसलेत. लुटारुंना माल वाटण्याशिवाय पर्याय नाही. ज्या कारखान्यांवर आरोप केले, त्याच कारखान्यांना मदत करत आहेत. सत्तेसाठी कुठल्याही पातळीपर्यंत तुम्ही जाऊ शकता. हे यावरुन दिसत असल्याचीही टीका त्यांनी यावेळी केली आहे.

पंतप्रधान शरद पवार यांच्याबाबत बोलले. त्याचं उत्तर शरद पवार देतीलंच. पण देशातील शेतीचं उत्पन्न वाढलं, हरित क्रांती ही काही नऊ वर्षांत झाली नाही. या देशातील कृषी क्षेत्राचा विकास, कृषी माल निर्यात कॉग्रेंसने केला असल्याचं प्रत्युत्तर वडेट्टीवारांनी दिलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube