आरोपींना व्हिआयपी ट्रीटमेंट, सुळेंचा वैष्णवीच्या वडिलांना सल्ला; फोनवरील संभाषणात काय-काय झालं?

आरोपींना व्हिआयपी ट्रीटमेंट, सुळेंचा वैष्णवीच्या वडिलांना सल्ला; फोनवरील संभाषणात काय-काय झालं?

VIP treatment to accused Supriya Sule’s advice to Vaishnavi’s father on phone conversation : अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) हिने गळफास घेऊन जीवन संपवल्यानं खळबळ उडाली. दरम्यान, वैष्णवीच्या मृत्यूवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेले पिडीतीचे पती, सासू आणि नणंद यांना अट करण्यात आली आहे.मात्र त्यांना आता व्हिआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे तक्रार केली. त्यावेळी त्यांनी वैष्णवीच्या वडिलांना आधार देत सल्ला दिला आहे.

लव्ह मॅरेज केलं पण रोजच भांडणं; मुख्याध्यापिका पत्नीनेच नवऱ्याचा… धक्कादायक खुनी कांड समोर

यावेळी ऑपरेशन सिंदूरमुळे सुप्रिया सुळे या केंद्रीय समितीमध्ये व्यस्त आहेत.त्यामुळे त्यांना पक्षाचें नेते प्रशांत जगताप यांना वैष्णवी हगवणेच्या कुटुंबियांशी भेट घेण्यासाठी पाठवलं होतं. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नमस्कार! व्हेरी व्हेरी स्वारी. मी वैष्णवीच्या आई-वडिलांना काय बोलू? मला समजत नाही. काय बोलू? असा प्रश्न पडतो. पण ही लढाई फक्त तुमची नाही. ही लढाई आमची आहे. तुम्ही या लढाईत एकटे नाही आहात. तुम्ही घाबरु नका. प्रशांत दादा माझी विनंती आहे. त्यांना सांगा, आपली लेक आहे.

उस्मानाबाद नाही आता धाराशिव रेल्वे स्टेशन; जीआर निघाला, खासदार निंबाळकरांनी दिली माहिती

त्यावर वैष्णवीचे वडील म्हणाले, अहो त्या तिघांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे. तिथे त्यांना हॉटेलचं जेवण मिळत आहे. आमचे परवा भाऊ गेले होते. रंगीला पंजाब हॉटेलमधून त्यांना जेवण जात आहे. हॉटेलचं नाव सुद्धा समोर आलंय.

PMO कार्यालयात उपसचिव ते बीडचे जिल्ह्याधिकारी, जाणून घ्या पुण्याचे नवीन आयुक्त नवल किशोर राम यांच्याबद्दल सर्वकाही

त्यावर सुप्रिया सुळेंनी त्यांना सल्ला दिला की, असं करा, उद्या आंदोलन करा आणि आंदोलनात हे सगळं बोला. मी त्यांना फक्त हात जोडून विनंती करते की, मला ऑपरेश सिंदूरसाठी जावं लागतंय. नाहीतर मी स्वत: आली असते. मनापासून दिलगिरी व्यक्त करते. मी परत आले तर लगेच तुम्हाला भेटायला येईन. प्रशांत दादा त्यांना समजून सागा, मी ऑपरेशन सिंदूरमुळे येऊ शकत नाही. मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube