आदित्य ठाकरेंचा ‘तो’ घाव मंत्र्यांच्या वर्मी लागला; मला बोलुद्या म्हणतं गुलाबराव पाटलांचा पाराच चढला

आदित्य ठाकरेंचा ‘तो’ घाव मंत्र्यांच्या वर्मी लागला; मला बोलुद्या म्हणतं गुलाबराव पाटलांचा पाराच चढला

Gulabrao Patil vs Aditya Thackeray : अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सभागृहात आदित्य ठाकरे आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. (Gulabrao Patil ) आदित्य ठाकरे यांनी मंत्र्यांनी सभागृहात अभ्यास करु यावा. एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहिती नसेल तर ते राखीव ठेवावे. मंत्र्याला सांगा अभ्यास करुन उत्तर द्या. पण यामुळे मंत्र्यांना त्यांचं खातं कळालंय की नाही, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली. त्यांच्या या टीकेचा रोख मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे होता.

थोरले मुंडे साहेब असते तर धनंजय मुंडेंना चाबकाने मारला असता, रोहित पवार भडकले

आदित्य ठाकरे हे खाली बसल्यानंतर गुलाबराव पाटील लगेच उठून उभे राहिले. आदित्य ठाकरे यांची खोचक टिप्पणी गुलाबराव पाटील यांच्या चांगलीच वर्मी लागली. त्यामुळे गुलाबराव पाटील यांनी भर सभागृहात आदित्य ठाकरेंचा बाप काढला. अहो यांच्या बापाला कळालं होतं, म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.

त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी ‘बाप’ ऐवजी ‘वडील’ शब्द वापरुन सारवासारव केली. मात्र, या प्रसंगाची विधिमंडळात चांगलीच चर्चा रंगली होती. गुलाबराव पाटील हे शिवसेनेत असताना उद्धव ठाकरे यांचा मुलगा असल्याने आदित्य ठाकरे यांचा आदेश गुलाबराव पाटील यांच्यासाठी शिरसावंद्य असायचा. त्यावेळी गुलाबराव पाटील यांच्यासारख्या नेत्यांच्या माना मातोश्रीवर तुकवल्या जायच्या. मात्र, आज शिंदे गटात गेल्यानंतर त्याच गुलाबराव पाटील यांनी सगळ्यांदेखत आदित्य ठाकरे यांचा बाप काढला.

गुलाबराव पाटील काय म्हणाले?

गुलाबराव पाटील हे सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते. यावेळी त्यांनी पाणीपुरवठ्यासंबंधीच्या प्रश्नांवर उत्तरे दिली. कृषी खात कधी युरीया वापरा तर कधी नॅनो युरिया वापरायला सांगत आहे. आपल्याला बैठक घेऊन यावर निर्णय घ्यावा लागेल. शेतकऱ्यांनी शेणखताचा वापर करावा यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे.

आपण पाण्याची समस्या असलेल्या गावांमध्ये आर ओ प्लांट लावले आहेत, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. गुलाबराव पाटील उत्तर देत असताना आदित्य ठाकरे बोलायला लागले. त्यावर गुलाबराव पाटील यांनी तुम्ही शांत बसा असे म्हटल्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांनी आक्षेप घेतला. यानंतर अध्यअध्यक्षांनी मध्यस्थी करत दोघांनाही शांत राहण्याचे आदेश दिले.

विधानसभेत नेमकं काय झालं?

आदित्य ठाकरे
मंत्री नेहमी केंद्र सरकारकडे बोट ठेवत दाखवतात
मग मंत्र्यांना खातं कळालं की नाही, हा प्रश्न आहे

गुलाबराव पाटील
– मला खात कळतं म्हणून तर त्याच्या बापाने मला खातं दिलं होतं

आदित्य ठाकरे
– म्हणून तर तुम्ही पळून गेले होते

विधानसभा अध्यक्ष

वैयक्तिक कमेंट करू नये.ते रेकॉर्डवरून काढून टाकावे

follow us
  • fb
  • instagram
  • youtube