Weather Update : राज्यात आज ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार; हवामान विभागाचा अलर्ट

Weather Update : राज्यात आज ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार; हवामान विभागाचा अलर्ट

Weather Update : राज्यात आता मान्सून पुन्हा सक्रिय (Maharashtra Rain) झाला आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून अनेक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबई-पुण्यातही पावसाने बॅटिंग सुरू केली आहे. आता पुढील 48 तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसाठी ऑरेंज तर पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे वेधशाळेने राज्यात येत्या 48 तासांत मुसळधार पाऊस होईल असा अंदाज दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार तर पुण्यात ढगाळ हवामान आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असे सांगण्यात आले.

Manipur Violence : हिंसेमध्ये आणखी दोघांचा मृत्यू , परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जवानांकडून गोळीबार

मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये आज मुसळधार पावसाचा (Maharashtra Rain) अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भागातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पुन्हा सक्रिय होत आहे. राज्यात आजपासून बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. त्यात काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. तर काही भागात रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. पुणे, मुंबई, नाशिक, नगर जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला आहे.

मोठी बातमी! आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक

नाशिक जिल्ह्याला पावसाने झोडपले

नाशिक जिल्ह्यात गुरुवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. शुक्रवारीही कोसळधार पाऊस झाला. त्यामुळे गोदावरीची पाणीपातळी वाढली आहे. नाशिकमध्ये जोरदार पावसाच्या बॅटिंगमुळे गंगापूर धरणांमध्ये दोन दिवसांपासून पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे सुरुवातीला पाचशे क्सुसेकने धरणातून पाणी सोडण्यात आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube