नगर-पुणे रोडवर भरधाव पिकअपची पाच वाहनांना धडक, ड्रायव्हरला पोलिसांनी घेतले ताब्यात
Ahmednagar Accident News : वाहतुकीच्या नियमांना (Traffic rules) डावलून वाहन चालविणे हे अनेकदा अपघातांना निमंत्रण देणं असतं. नुकताच सुपा बस स्थानकात (Supa Bus Station) एक गंभीर अपघात झाला आहे. बस स्थानक परिसरात एका पिकअपने पाच वाहनांना जोराची धडक दिली असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या वाहनांच्या अपघातामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. तर तीन-चार जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या अपघाताप्रकरणी बेजाबदारपणे वाहन चालविणाऱ्या पिकअप वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (A pickup collided with five vehicles in Supa bus station area)
https://www.youtube.com/watch?v=I2f9gQrbQD0
याबाबत अधिक माहिती अशी, आज सकाळच्या सुमारास पिकअप चालक सोहेल शेख (रा. छञपती संभाजीनगर) हा वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करत अत्यंत बेजाबदारपणे वाहन चालवत पुण्याहून छञपती संभाजीनगरच्या दिशेने येत होता. सोहेल हा भरधाव वेगाने वाहन चालवत होता. त्याचे पिकअप वाहन हे सुपा बस स्थानक परिसरात आले येताच त्याने प्रथम त्याने एका कारला जोराची धडक दिली.
पवार चुकले मग काय गोळ्या घालणार का? सदाभाऊ खोत यांचं पुन्हा वादग्रस्त विधान
या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाल्याने पिकअप चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु धडक दिल्याने त्याच्या गाडीचा बँलस हालल्याने पुढे तो एका उभ्या असलेल्या रिक्षाला धडकला. यात रिक्षाचेही मोठे नुकसान होऊन आतील प्रवाशी व्यक्तीला जोरदार मार बसला. पुढे या पिकअपने उभ्या असलेल्या दोन मोटार सायकलस्वारांना जोराची धडक दिली. यात अनेक जण जखमी झाले आहेत.
दोन दुचाकीस्वारांना धडक देत पिकअप चालकाने आणखी एका कारला जोराची धडक दिली व थांबली. दरम्यान या अपघातात पिकअप चालक सोहेल शेख याने निष्काळजीपणे वाहन चालवत दोन कार, एक रिक्षा व दोन मोटारसायकला जोराची धडक देऊन अनेक व्यक्तींना जखमी केले आहे.
या अपघातामध्ये दोघे गंभीर जखमी झाले आहे. यातील एका जखमीला अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात हलवले असून एकावर सुपा येथील खाजगी रुग्णालयात उपचार केले जात आहे. पिकअप चालकाला नागरिकांनी सुपा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.