अहिल्यादेवी जयंती महोत्सवावरून राम शिंदे-रोहित पवारांमध्ये संघर्ष ! चौंडीत दोन कार्यक्रम

  • Written By: Published:
अहिल्यादेवी जयंती महोत्सवावरून राम शिंदे-रोहित पवारांमध्ये संघर्ष ! चौंडीत दोन कार्यक्रम

Rohit Pawar Vs Ram Shinde : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या येत्या 31 मे रोजी होणाऱ्या 299 व्या जयंती महोत्सवास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चौंडी येथे उपस्थित राहणार आहेत. पहिल्यांदाच सरकारी निधीतून हा जयंती महोत्सव होणार आहे. या जयंती महोत्सवावरून आमदार राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात राजकारण पेटले आहे. आमदार रोहित पवार यांनी जयंतीच्या दिवशीच गावात एक कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी दिली नाही तरी मिरवणूक काढण्यावर रोहित पवार हे ठाम आहेत. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी रोहित पवार यांनी आज बैठकही घेतली आहे.


कुकडीच्या पाण्यावरुन खासदार विखेंचा राष्ट्रवादीच्या नेत्यांवर रोख…

आमदार रोहित पवार म्हणाले, गेल्या वर्षी मी अहिल्यादेवी होळकर जयंतीचा कार्यक्रम घेतला होता. त्याला शासनाने एक रुपया दिलेला नव्हता. सरकारी कार्यक्रमाला माझा पाठिंबा आहे. ग्रामस्थांच्या इच्छानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवीची यात्रा काढणार आहे. गावातून मिरवणूक काढली जाईल. त्यासाठी हत्ती, घोडे आणण्यात येणार आहे. हा आध्यात्मिक कार्यक्रम आहे. अक्षय शिंदे हे अहिल्यादेवी होळकर यांचे वशंज आहेत. तेही आमच्याबरोबर आहेत.

Nana Patole : एकनाथ शिंदे गारुडी तर देवेंद्र फडणवीस फेकण्यात एक्सपर्ट…

या यात्रेला प्रशासनाने परवानगी दिली पाहिजे. परंतु प्रशासनावर राम शिंदे यांच्याकडून दबाव आणला जात आहे. परवानगी नाही दिली तरी यात्रा काढण्यावर रोहित पवार हे ठाम आहेत. त्याचबरोबर रोहित पवार यांनी राम शिंदे यांनीही डिवचले आहे. मी लोकांतून निवडून आलो आहे. त्यामुळे त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी लोक माझ्याबरोबर आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

चौंडीच्या विकासासाठी महाविकास आघाडीच्या काळात बारा कोटींची निधी आणला होता. त्याला राम शिंदे यांनी स्थगिती आणली होती. ही स्थगिती कोर्टाने उठविली आहे. राम शिंदे यांनी खालच्या पातळीवर राजकारण केल्याचा आरोपही पवार यांनी केला आहे.

गेल्या वर्षी रोहित पवार यांनी शासकीय कार्यक्रम आयोजित केला होता. तेथे सभाही झाली होती. त्यावेळी आमदार राम शिंदे, गोपीचंद पडळकर यांनी प्रतिसभा घेतली होती. त्या ठिकाणी मोठा राडा झाला होता. सरकार बदलल्यानंतर आता राम शिंदे हे शासकीय कार्यक्रम घेत आहेत. तर रोहित पवार हे त्यांच्याविरोधात गावातून मिरवणूक यात्रा काढणार आहेत. त्यामुळे यंदाही दोघांमध्ये जोरदार संघर्ष दिसून येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube