Ahmednagar जिल्हाधिकारी Rajendra Bhosle ची मुंबईत बदली, सालीमठ नवे जिल्हाधिकारी

  • Written By: Published:
WhatsApp Image 2023 02 14 At 7.53.18 PM

मुंबई : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले (Rajendra Bhosle) यांची मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागेवर सिद्धराम सालीमठ (Siddharam Salimath) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सरकारने मंगळवारी(दि. १४) सायंकाळी पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. त्यात अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्यासह निधी चौधरी, राधाबिनोद शर्मा, दीपा मुधोळ-मुंढे यांचाही समावेश आहे.

Nilesh Rane चं वादग्रस्त ट्विट… ‘पवार कुटुंब पूर्ण *** मेंदूचं’

…अशी असेल नवी नियुक्ती
१) अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची नवी मुंबईच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
२) औरंगाबाद सिडकोच्या मुख्य प्रशासक दीपा मुधोळ-मुंढे यांची बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
३) बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची औरंगाबाद सिडकोच्या मुख्य प्रशासक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
४) नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले सिद्धराम सालीमठ यांची अहमदनगर जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
५) मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी शर्मा यांची मुंबई येथील विक्रीकर सहआयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Tags

follow us