Ahmednagar Crime : नगरमध्ये हल्ल्यांचं सत्र सुरुच! भर चौकात युवकाला भोसकलं…

Ahmednagar Crime : नगरमध्ये हल्ल्यांचं सत्र सुरुच! भर चौकात युवकाला भोसकलं…

Ahmednagar Crime : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये हल्ले करण्याचे सत्र सुरुच आहेत. नूकताच शहरात एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा खून करण्यात आलेली घटना ताजी असतानाच आता एका युवकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडलीयं. दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरुन एका युवकाला भर चौकातच चाकून भोसकलं आहे. ही घटना अहमदनगर शहरातील चाणक्य चौकात घडली.

शिंदेंच्या अन् अजितदादांच्या 100 आमदारांना 65 टक्के निधी : आकडेवारीसहित थोरातांचे गंभीर आरोप

फ्रान्सिस विलास उबाळे (रा.पंचशलीवाडी रेल्वे स्टेशन) शहरातील चाणक्य चौकातून जात असताना समोरुन येणाऱ्या अनोळखी मुलांचा त्यांच्या गाडीला धक्का लागला. गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला.

मणिपूर घटनेचे पुण्यात पडसाद! पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी…

या वादानंतर आरोपींनी फ्रान्सिस उबाळे यांना बिटांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपी विशाल भंडारी यांने चाकूने फ्रान्सिस उबाळे याच्यावा वार केला. या घटनेत उबाळे गंभीर जखमी झाले आहेत. या मारहाणीमध्ये उबाळे यांच्या डोक्यावर 2 टाके पडले आहेत.

धर्मवादावरुन Ashutosh Rana यांची परखड भूमिका; म्हणाले, “क्या खुदा ने मंदिर तोडा…”

मारहाणीच्या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनेची चौकशी केली. या प्रकरणात आरोपी शुभम धुमाळ(रा. सारसनगर), संकेत खापरे(रा. विनायक नगर), विशाल भंडारी (रा. वाकोडी रोड), गोविंद पवार(भोसले आखाडा) अन्य दोन आरोपींवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. जखमी आरोपी विशाल भंडारी याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, मनोज कचरे, शाहिद शेख, रवी टकले, प्रमोद लहारे, सुमित गवळी, दीपक रोहोकले, नितीन शिंदे यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube