राज्यस्तरीय शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत ड वर्ग महानगरपालिकांमध्ये ‘अहमदनगर मनपा’ तिसरी

राज्यस्तरीय शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत ड वर्ग महानगरपालिकांमध्ये ‘अहमदनगर मनपा’ तिसरी

‘Ahmednagar’ Municipal Corporation is the third among D Class Municipal Corporations in the entire state : महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शहर सौंदर्यीकरण स्पर्धा 2022 अहमदनगर महानगरपालिकेने (Ahmednagar Municipal Corporation) ड वर्ग महानगरपालिकांच्या गटामध्ये राज्यातून तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. 20 एप्रिल या नगर विकास दिनाचे औचित्य साधून एनसीपीए येथे झालेल्या भव्य समारंभामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहमदनगर महानगरपालिकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा रुपये 5 कोटींचा धनादेश व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी, आयुक्त तथा संचालक किरण कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.

अहमदनगर महानगरपालिकाच्या वतीने महानगरपालिकेच्या महापौर रोहिणीताई शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, महिला व बालकल्याण सभापती पुष्पाताई बोरुडे, आयुक्त पंकज जावळे, उपायुक्त यशवंत डांगे यांनी हा पुरस्कार स्विकारला.

चर्चा तर होणारच ना ! पिंपरीत अजितदादांचे भव्य फलक पण, राष्ट्रवादीच गायब

महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास विभागाने राज्यातील सर्व महापालिका, तसेच नगरपालिकांमध्ये शहर सुधारणा व सौंदर्यीकरण स्पर्धा घेतला होती. या स्पर्धेमध्ये विविध घटकांनुसार, गुणांकन पध्दतीनं वर्गनिहाय सर्वात्कृष्ट महानगरपालिका व नगरपालिका यांची राजस्तरीय तपासणी समितीने पाहणी करून निवड केली आहे. या स्पर्धेसाठी मध्यवर्ती चौक, ऐतिहासिक वारसा स्थळे व स्मारक जलाशयांचे संवर्धन, बाजारपेठा यांचे सौंदर्यीकरण, तसेच सुंदर हरित पट्ट्यांची निर्मिती, स्वच्छता अशी घटकांचा समावेश होता. या करिता महानगरपालिकेने राबवलेले अनेक उपक्रम महत्वाचे ठरले.

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या विकासकामांमुळं अहमदनगर महानगरपालिका राज्य पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण करेल, यात शंका नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube