नगरमधील रस्ते होणार चकाचक ! खासदार विखेंनी आणले दहा कोटी

  • Written By: Published:
नगरमधील रस्ते होणार चकाचक ! खासदार विखेंनी आणले दहा कोटी

अहमदनगरः नगरमधील रस्त्ये खराब झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची वाईट अवस्था आहे. आता मात्र शहरातील रस्ते चकाचक होणार आहेत. रस्त्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी १० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन आदेशही निघाला असल्याची माहिती खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

खड्डे मुक्त रस्त्यांकरीता नगर विकास विभागाच्या माध्यमातून विशेष रस्ता अनुदान मिळावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन २५ कोटी रुपयांच्या निधीची उपलब्धता करून देण्याची विनंती केली होती. यापैकी ५ कोटी रुपयांच्या निधीची उपलब्धता झाली होती. या निधीचा दुसरा टप्पा म्हणून आता १० कोटी रुपयांच्या निधीची उपलब्धता करण्यासही नगरविकास विभागाने मान्याता दिली असल्याचे खा डॉ सुजय विखे पाटील म्हणाले.

दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना

नगर शहरातील नागरिकांना भेडसावणारी रस्त्यांची समस्या कायमस्वरुपी सोडविण्यासाठी विखे पाटील यांनी नगरविकास विभागाकडे निधीसाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. मागणी केल्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन टप्प्यांमध्ये निधी मंजूर करून केलेल्या सहकार्याबद्दल विखे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचे आभार मानले आहेत.

Girish Bapat : बापट कायम पुणेकरांच्या स्मरणात राहतील; धंगेकरांनी जागवल्या आठवणी

उपलब्ध होणाऱ्या निधीतून शहरातील रस्त्याच्या कामांना गतीने पूर्ण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या निधीच्या मंजुरीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खा. डॉ. सुजय विखे यांनी केलेल्या सहकार्याबदद्ल नगरसेवकांनी तसेच भाजपच्या शहरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आभार मानले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube