अहमदनगर महाविद्यालयात शिवजयंतीवरुन वाद, एका गटाकडून विद्यार्थ्याला मारहाण
अहमदनगर : अहमदनगर महाविद्यालयात काल दुपारच्या दरम्यान दोन गटांत वाद झाल्याची घटना घडली. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
फिर्यादीत म्हंटलं की, अहमदनगर महाविद्यालयात शिकत असलेल्या करण पाटील नामक विद्यार्थी त्याच्या मित्रांसह महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यासाठीचं निवेदन देण्यासाठी प्राचार्यांच्या कार्यालयाकडे जात होता.
पाटील प्राचार्यांच्या कार्यालयाकडे जात असतानाच त्याला अचानक 20 ते 30 तरुणांनी येऊन मारहाण करण्यास सुरुवात केलीय. यावेळी मारहाण करण्यात आलेल्या तरुणांकडून महाविद्यालयात शिवजयंती साजरी करु देणार नसल्याचं त्याला सांगण्यात आलं.
मारहाण सुरु असतानाच महाविद्यालय परिसरात मोठी गर्दी झाल्यानंतर महाविद्यालयातील शिक्षक जमा होताच, या तरुणांन तेथून पळ काढला आहे. याबाबत माहिती फिर्यादीने कोतवाली पोलिस ठाण्यात दिलीय. या प्रकरणी कोतवाली पोलिसांकडून मारहाण केल्याप्रकरणी काही तरुणांना ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अहमदनगर कॉलेजमध्ये शिवजयंती साजरी करण्याची परवानगी द्यावी, यासाठी कॉलेजच्या प्राचार्यांकडे एक गट गेला असता, दुसऱ्या गटाने त्यांना मारहाण केल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय.
संक्रातीच्या दिवशीही पतंग उडवण्याच्या करण्यावरून दोन गटात वाद झाला होता, त्यानंतर दगडफेक झाली होती. अशातच आता महाविद्यालयात दोन गट एकमेकांशी भिडल्याने काही तणावाचे वातावरण पाहायला मिळाले होते.
नुकत्याच झालेल्या मकरसंक्रात सणाच्या दिवशी काही तरुणांकडून सायंकाळी 6 च्या दरम्यान, डिजे साऊंडवर हनुमान चालीसा लावण्यात आला होता. त्यावरुन काही ठिकाणी किरकोळ वाद झाल्याचं समोर आलं होतं.
त्यानंतर संक्रातीच्या दिवशीच दुसरी घटना म्हणजे कोठला चौक इथे दोन गटांत दंगल झाल्याची घटना घडली. या संपूर्ण प्रकरणावरुन जातीय सलोखा बिघडवण्याचं षडयंत्र काही लोकांकडून केलं जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात शहरात सुरु आहे.