ठाकरेंकडून न्याय मिळावा; मला कुठल्याही पक्षात प्रवेश…; बबनराव घोलप यांनी स्पष्टचं सांगितलं

  • Written By: Published:
ठाकरेंकडून न्याय मिळावा; मला कुठल्याही पक्षात प्रवेश…; बबनराव घोलप यांनी स्पष्टचं सांगितलं

Babanrao Gholap : शिर्डी लोकसभा (Shirdi Lok Sabha) मतदारसंघात यंदा निवडणुकीच्या तिकिटासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. सध्या शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हे या मतदार संघाचं नेतृत्व करताहेत. अशातच माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उबठात प्रवेश केल्याने माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) नाराज आहेत. त्यांच्याकडील संपर्कप्रमुख पद काढून घेण्यात आलं. त्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. दरम्यान, मला उध्दव ठाकरेंकडून न्याय मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

घोलप यांची ठाकरेंच्या सेनेचे शिर्डी लोकसभेसाठी संपर्क नेता म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, त्याच्या काही दिवसानंतर माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांचा ठाकरे गटात प्रवेश झाल्यानं घोलप अस्वस्थ होते. आज त्यांनी आपल्या समर्थकांसह बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर येऊन शक्तिप्रदर्शन केले. यावेळी बोलतांना घोलप यांनी सांगितल की, हे शक्ती प्रदर्शन स्वयंस्पृतीने कार्यकर्त्यांनी केले आहे. जो काही प्रकार झाला. तो व्यवस्थित झाला नाही. त्यामुळे समाज नाराज झाला आहे. मी आजही अपेक्षा करतो की, उद्धव ठाकरेंकडून मला न्याय मिळावा .

Manoj Jarange Patil यांची तब्येत खालावली, रुग्णालयात दाखल; जालन्याहून थेट संभाजीनगरला नेलं; नेमकं झालं काय? 

ते म्हणाले, भाऊसाहेब वाघचौरे यांचा प्रवेश स्वतः उद्धव ठाकरेंनी दोनदा नाकारला. तसे त्यांनी मला मेसेज देखील केले होते. मात्र तिसऱ्यांदा अचानक त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला. त्यांना आता उमेदवारीचं गाजर दाखवले आहे. मला ज्याप्रमाणे शिर्डी लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती, ती पुन्हा जाहीर करावी. माझे संपर्कप्रमुख हे पद का काढले ?माझी काही चूक होती हे मला कळालं पाहिजे. मला कुठल्याही पक्षात प्रवेश करायचा नाही. त्यामुळे पुन्हा मला काम करण्यासाठी आदेश द्यावेत, असं घोलप म्हणाले.

ते म्हणाले, मला न्याय मिळावा. मी उद्धव ठाकरेंकडे वेळ मागितली आहे. मात्र त्यांची वेळ भेटली नाही. मला अपेक्षा आहे ते मला वेळ देतील आणि न्याय देतील, असं घोलप यांनी सांगितलं.

आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सेनेमध्ये ज्या फुटी-टूटी होतात हे कशामुळे होतं? यामध्ये पक्षप्रमुखांनी लक्ष घालण्याची गरज आहे. शिवसेनेला महाराष्ट्रामध्ये चांगले वातावरण आहे. लोकांची अपेक्षा आहे की, उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत. त्यामुळे पक्षामध्ये घडणाऱ्या गोष्टी उद्धव ठाकरे यांनी थांबवल्या पाहिजेत, असंही घोलप म्हणाले.

 

 

 

 

 

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube