रोहित पवार धावले विद्यार्थ्यांच्या मदतीला, सामाजिक कार्यकर्त्यांना ‘ही’ विनंती
अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून सध्या राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. यातच पोलीस व उपोषणकर्त्यांमध्ये झालेल्या वादानंतर वातावरण चिघळले. पोलिसांकडून उपोषणकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. संतप्त जमावाने निषेध करत थेट बस पेटवल्या. दरम्यान खबरदारीची भूमिका म्हणून राज्यात अनेक ठिकाणी बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असून याप्रश्नी आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावले आहे. तसेच आमदार पवार यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना एक विनंती देखील केली आहे.
आमदार पवारांचे ‘त्या’ कार्यकर्त्यांना विनंती
जालना जिल्ह्यात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्ह राज्यात अनेक ठिकाणी बंद पाळण्यात येत आहेत. तसेच काही भागात बस सेवा देखील बंद आहेत. बससेवा खंडित झाल्याने सद्यस्थितीला सरळसेवा परीक्षांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्याबाबत अनेक विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत. त्यामुळे सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती आहे की, विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये यासाठी आपण सर्वांनी नेहमीप्रमाणे सहकार्याची भूमिका घ्यावी.
Maratha Andolan : ‘मी तुमच्यासोबत, काळजी करू नका’; राज ठाकरेंचा फोनवरून जरांगेंना शब्द
मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation agitation) मागणीसाठी जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात गेल्या चार दिवसापांसून उपोषण सुरु होते. मात्र, शुक्रवारी (01 सप्टेंबर) पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये झालेल्या वादानंतर दगडफेक आणि लाठीचार्ज करण्यात आला. यामुळे वातावरण चिघळले गेले व त्यानंतर संतप्त जमावाने बस जाळल्या. तब्बल 25 बस जाळण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे खबरदारीची भूमिका म्हणून अनेक ठिकाणी बससेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
दोन दिवसात सव्वा कोटींचे नुकसान
जालन्यात झालेल्या हिंसक आंदोलनानंतर (Maratha reservation agitation) अनेक ठिकाणी बससेवा बंद करण्यात आली आहे. याच पार्शवभूमीवर नगर जिल्ह्यात बससेवा बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान नगर जिल्ह्यातील 11 डेपोमध्ये तब्बल 635 बस या दररोज प्रवास करत असतात. शनिवारी व रविवारी बसस्थानकातून एकही बस डेपो बाहेर पडली नसल्याने परिवहन महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. दोन दिवस बससेवा ठप्प झाल्याने दोन दिवसात महामंडळाचे जवळपास एक कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. दरदिवशी नगर परिवहन महामंडळाला प्रवाश्यांच्या माध्यमातून तब्बल 65 लाखांचा महसूल हा गोळा होता असतो.