अवकाळीची अवकृपा, अहमदनगर जिल्ह्यात साडेनऊ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

Untitled Design   2023 04 11T121133.450

Crops on more than nine thousand hectares in Ahmednagar district were affected : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) थैमान घातले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या भागात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीठ झाली. चार दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार अहमदनगर जिल्ह्यात गारपीट, वादळी वाऱ्याचा साडेनऊ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून (Department of Agriculture देण्यात आली.

चार दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील गावे बाधित झाली आहेत. या अवकाळीमुळे पिके नष्ट झाल्यानं बळीराजाच्या तोडंच पाणी पळाले आहे. या अवकाळीचा सर्वाधिक फटका नगर, नेवासा, शेवगाव तालुक्यांना बसला आहे. काढणीस आलेला कांदा, गहू, उन्हाळी बाजरी, हरभरा, आंबा बागांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसानं अहमदनगर ११८३, पारनेर १८०, नेवासा ४३००, शेवगाव २१९७, कर्जत १५६, राहुरी ३४८, संगमनेर २८० आदी हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

ऐन उन्हाळ्यात राज्यावर अवकाळी पावसाचे सावट आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला होता. तेव्हा पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीतून सावरत असतांनाच पुन्हा एकाद अवकाळी पावसाने पिकांना चांगलचं झोडपून काढलं, त्यामुळं शेती पीके मातीमोल झाली आहेत. पिके नष्ट झाली, परिणामी, हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्यानं बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. त्यातच आता पुन्हा एकदा हवामान विभागाने आणखी चार दिवसांच्या पावसाचे भाकित वर्तवल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. जिल्हा प्रशासनाकडूनही नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. आधीच पिकांना योग्य भाव नसल्याने बळीराजा आर्थिक संकटात आहे. त्यातच अस्मानी संकटामुळं बळीराजा आणखी आर्थिक खाईट लोटल्या गेला आहे.

Vivek Agnihotri: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ट्वीट करत म्हणाले, “राजकीय पक्षांनी माझ्या विरोधात..”

Tags

follow us