Earthquake : साताऱ्यात जमीन हादरली! भूकंपाच्या धक्क्याने नागरिक भयभीत
Earthquake : सातारा जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. कोयना धरण परिसराराला पुन्हा एकदा भूकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के बसले आहेत. काल रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास भूकंप होत असल्याचे जाणवू लागले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाली नाही. साताऱ्यात याआधी ऑगस्ट महिन्यात भूकंप झाला होता. त्यावेळचाही भूकंप सौम्यच होता. आताही दोन महिन्यांनंतर पुन्हा भूकंप झाला आहे. या भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली. या भूकंपाने नागरिक मात्र चांगलेच घाबरले होते. भूकंपाचे धक्के जाणवू लागताच नागरिकांची पळापळ सुरू झाली होती. काही जणांनी तर रात्र अक्षरशः जागून काढली.
कोल्हापूर, साताऱ्यात जमीन हादरली! भूकंपाच्या सौम्य धक्क्याने नागरिक भयभीत
काल रात्री हा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू नेमका कुठे होता याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेत कोणतेही नुकसान झालेले नाही. कोयना धरणही सुरक्षित असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. साताऱ्यात दोन महिन्यात दुसऱ्यांदा भूकंप झाला आहे. याआधी ऑगस्ट महिन्यात साताऱ्यासह कोल्हापुरात भूकंप झाला होता. त्यावेळचाही भूकंप सौम्य होता त्यामुळे नुकसान झाले नाही.
सातारा जिल्ह्यातील पाटण शहरालगत गावांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. पहाटे 6 वाजून 40 मिनिटांनी हा भूकंप झाला होता. सकाळच्या वेळी फिरायला निघालेल्या लोकांमध्ये घबराट पसरली. कोयना धरणापासून वीस किलोमीटर अंतरावर भूकंपाचे धक्के बसले. सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
An earthquake with a magnitude of 3.3 on the Richter Scale hit Satara, Maharashtra at 11:36 pm today: National Center for Seismology pic.twitter.com/60w8LXwmI6
— ANI (@ANI) October 16, 2023
याआधी जुलै महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भूकंप झाला होता. जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात हा भूकंप झाला होता. माडखोल, कलंबिस्त, सरमळे, ओटवणे, कारिवडे, कोनशी, भालावल, ओवळीये, धवडकी या गावांत मोठा आवाज झाला होता. काही काळ जमीनही हादरली होती. त्यानंतर असाच भूकंप आता कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात आज झाला आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून देशात सातत्याने भूकंपाच्या घटना घडत आहेत. भारतच नाही तर पाकिस्तान, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, चीन या देशातही भूकंप होत आहेत. भारतात दिल्ली, आसाम, उत्तराखंड, राजस्थान, हिमाचल प्रदेश, अंदमान निकोबार बेटांवर भूकंप झाला होता. या घटनांनी लोकांत घबराट पसरली आहे. भूगर्भात होत असलेल्या हालचालींमुळे ऐन पावसाच्या दिवसात या संकटाचा सामना लोकांना करावा लागत आहे.
पुण्यात भीषण अपघात ! ट्रकला आग लागून चौघांचा होरपळून मृत्यू