49 कोटी 85 लाख रुपये मुश्रीफ कुटुंबियांच्या खात्यावर गेले कसे? सोमय्यांचा सवाल

49 कोटी 85 लाख रुपये मुश्रीफ कुटुंबियांच्या खात्यावर गेले कसे? सोमय्यांचा सवाल

कोल्हापूर : ईडीनं काही दिवसांपूर्वी मिया हसन मुश्रीफ यांच्या अनेक कंपन्या आणि कार्यालयांवर धाडी टाकल्या. रजत प्रायव्हेट आणि माऊंट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या खात्यावरुन 49 कोटी 85 लाख रुपये मुश्रीफ कुटुंबियांच्या खात्यावर आले. त्यावर हसन मुश्रीफ काहीच बोलत नसल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलाय. कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केलीय.

आपल्या जावयासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीवर एक जिझिया कर लावण्यात आला. प्रत्येक ग्रामपंचायतीनं 50 हजार रुपये जावयाच्या कंपनीला देण्याचा आदेश हसन मुश्रीफांनी काढला. त्यामुळं दरवर्षी 150 कोटी रुपयांचा भुर्दंड सरकारला बसणार होता, आम्ही हा घोटाळा समोर आल्यानंतर कंत्राट रद्द केलं पण, याची पूर्ण चौकशी होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. हुंडा म्हणून हसन मुश्रीफांनी जावयाला दरवर्षी 150 कोटी रुपये दिल्याचा आरोप सोमय्यांनी लगावलाय.

यावेळी सोमय्या म्हणाले की, मुंबई महापालिकेत कोविड घोटाळा झालाय. तत्कालीन सत्ताधारी नेत्यांसाठी कोविड एक कमाईचं साधन होतं. संजय राऊत यांचे सहकारी सुजित पाटकर यांनी लाईफलाईन रुग्णालय सर्व्हिसेसला 100 कोटी रुपयांचं कंत्राट दिलं. ही कंपनी कधीच अस्तित्वात नव्हती. त्यांना रुग्णालय चालवण्याचा कोणाताही अनुभव नाही. मग, त्या कंपनीला 100 कोटींचं कंत्राट कसं दिलं? या कंपनीच्या हलगर्जीपणामुळं अनेक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोपही यावेळी किरीट सोमय्यांनी केलाय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube