पदभार स्विकारण्यावरुन दोन आयुक्तांमध्ये तू-तू में में; केबिनमध्ये शेजारीच खूर्ची लावून बसले
Ichalkaranji News : कोल्हापुरमधील इचरलकरंजी महापालिकेमध्ये (Ichalkaranji Muncipal Corporation) आज काहीही आलबेल नसल्याचं समोर आलंय. महानगरपालिकेच्या आयुक्ताची बदली करण्यात आली होती, या अधिकाऱ्याच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली होती. ज्या दिवशी दुसऱ्या अधिकाऱ्याने पदभार स्विकारला त्याच दिवशी बदली झालेल्या अधिकाऱ्याने बदलली स्थगिती आणली. त्यामुळे दोन्ही अधिकाऱ्यांनी एकाच दिवशी केबिनमध्ये दाखल होत आपल्या पदाचा कार्यभार स्विकारुन कामाला सुरुवात केल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्यानंतर त्यांनी शेजारी-शेजारी खूर्चीवर बसून कामाला सुरुवात केलीयं.
नेमकं काय घडलं?
इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे (Omprakash divate) यांची बदली करण्यात आली होती. पल्लवी पाटील (Pallavi patil) यांची त्यांच्याजागी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, ओमप्रकाश दिवटे यांनी बदलीला स्थगिती आणली. त्याचवेळी पल्लवी पाटील यांनी आपल्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारला. महापालिकेत आज ओमप्रकाश दिवटे आणि पल्लवी पाटील यांनी दोघांनीही एकदाच पदभार स्विकारला.
मोठी बातमी : फिर एक बार अजित डोवाल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी तिसऱ्यांदा डोवाल यांची नियुक्ती
यादरम्यान, दिवटे यांचा पाटील यांच्याशी वादही झाला. याचवेळी दिवटे यांनी त्यांना बदलीला स्थगिती आणण्यात आल्याची कागदपत्रेही सादर केली. मात्र पल्लवी पाटील यांनी काही पदभार सोडलाच नाही. विशेष म्हणजे कागदपत्रे सादर केले तरीही पल्लवी पाटील यांनी दिवटे यांच्या खुर्चीशेजारीच आपली खुर्ची लावत कामाला सुरुवात केलीयं.
मोठी बातमी : विधानसभेसाठी ‘राज’ खेळी, मोदींना पाठिंबा देणारे राज ठाकरे देणार मोठा धक्का
दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये पदभारावरुन जोरदार वाद सुरु होताच वरिष्ठांनी मध्यस्थी करीत पल्लवी पाटील यांच्याशी संवाद साधला. वरिष्ठांचा फोन आल्यानंतर पल्लवी पाटील यांनी अखेर महापालिकेतून बाहेर पाय ठेवला. या संपूर्ण घडामोडी सुरु असताना ओमप्रकाश दिवटे आणि पल्लवी पाटील यांच्यात जोरदार वादावादी सुर असल्याचं दिसून आलं होतं.
दरम्यान, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅटने पल्लवी पाटील यांच्या नियुक्तीला नुकतीच स्थगिती दिली होती. तसंच ओमप्रकाश दिवटे यांची निवड कायम ठेवली होती. ओमप्रकाश दिवटे हे मागील वर्षापासून आयुक्त आणि प्रशासक म्हणून काम पाहात आहेत. मात्र त्यांची मुदतीआधीच बदली झाली. त्यांच्या जागी पल्लवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र दोन वर्ष आधीच बदली कशी काय झाली, असा प्रश्न उपस्थित करत ओमप्रकाश दिवटे मॅटमध्ये गेले होते. मॅटने दिवटे यांची बाजून ऐकून, त्यांच्या बदलीला स्थगिती दिली.