अतुलबाबा भोसलेंना मोठ्या मताधिक्याने निवडून देणार, माजी सैनिकांचा निर्धार

  • Written By: Published:
अतुलबाबा भोसलेंना मोठ्या मताधिक्याने निवडून देणार, माजी सैनिकांचा निर्धार

Dr. Atulbaba Bhosale : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्य (Narendra Modi) नेतृत्वाखालील भाजपा सरकारने देशाच्या संरक्षण व्यवस्थेला बळकटी मिळवून दिली आहे. देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देण्यासाठी सज्ज असलेल्या आजी –माजी सैनिकांच्या हितासाठी त्यांनी अनेक कल्याणासाठी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा भाजप-महायुतीचे सरकार आणण्यासाठी कराड दक्षिणमधून डॉ. अतुलबाबा भोसले (Dr. Atulbaba Bhosale) यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार माजी सैनिकांनी व त्यांच्या कुटुंबियांनी वाठार येथे आयोजित भव्य मेळाव्यात केला.

विरोधकांच्या भूलथापांना जनता भुलणार नाही ; विंगमध्ये डॉ. अतुलबाबा भोसले यांचं विधान 

भाजपा-महायुतीचे कराड दक्षिणमधील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ वाठार (ता. कराड) येथील विराज मल्टिपर्पज हॉलमध्ये माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर सैनिक फेडरेशनचे प्रशांत कदम, एस. ए. माशाळकर, व्ही. वाय. चव्हाण, निवृत्त सुभेदार नागेश जाधव, निवृत्त कर्नल महादेव काटकर, ‘मेस्को’चे मोहिते, जयराम स्वामी मठाचे विठ्ठलस्वामी महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ.अतुलबाबा भोसलेंची सभा फडणवीसांनी गाजवली, पाहा फोटो 

यावेळी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधताना डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, ज्यांनी देशाच्या सीमेचे संरक्षण करण्यात महान योगदान दिले, अशा माजी सैनिकांसोबत मला संवाद साधण्याची संधी मिळतेय, याचा मला विशेष आनंद आहे. आपला जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा व सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशात २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे देशाचे संरक्षण क्षेत्र अधिक मजबूत झाले आहे. आज आपण संरक्षण क्षेत्रात इतके प्रबळ झालो आहोत, की शेजारील देश आपल्या वाकड्या नजरेने पाहू शकत नाहीत. पंतप्रधान मोदींनी देशातील आजी – माजी सैनिकांच्या हिताला नेहमीच प्राधान्य देण्याचे धोरण आखले आखले.

देशसेवेसाठी तत्पर असलेल्या सर्वच सैनिकांबद्दल व त्यांच्या कुटुंबीयांबद्दल मला नितांत आदर आहे. त्यामुळे कराड दक्षिणमधील आजी – माजी सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रत्येक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी सदैव कटीबद्ध असून, आपली सेवा करण्याची संधी मला मिळावी, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.

यावेळी माजी सैनिकांनी डॉ. अतुलबाबा भोसले यांना जाहीर पाठिंबा देत, त्यांच्या विजयाचा निर्धार केला. याप्रसंगी माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube