Devendra Fadnavis Sabha In Karad : कराड दक्षिणमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले आहेत.
महायुतीचे उमेदवार अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. यावेळी उदयनराजे भोसले, सुरेशबाबा भोलले, सोमनाथ धुमाळ आदी नेते उपस्थित होते.
डॉ. अतुलबाबा यांच्यासाठी आज कराडच्या मलकापूर येथे भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभा घेतली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहे.
महायुतीचं सरकार आल्यानंतर अडीच वर्षांत 700 कोटींचा निधी मतदारसंघात आणण्यात यशस्वी झालो, असं डॉ. अतुलबाबा यांनी प्रतिपादन केलंय.
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतांना त्यांनी साधी फुटकी कवडीही दिली नाही, अशी टीका करत आमच्या पेनला लकवा कधी मारतच नाही, असं फडणवीस म्हणाले.
आता कराडचा फैसला झाला, कराडकर अतुलाबाबांना विधानसभेत पाठवतील, असं फडणवीस म्हणाले.
अब, हवाओ का रूक बदल चुका है, 23 तारखेला दक्षिण कराडचे आमदार अतुलबाबा भोसलेच होणार, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
माझ्या तमाम लाडक्या बहिणांनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो असं म्हणत फडणवीसांनी भाषणाला सुरूवात केली.
आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभेचे मटेरियलच नाहीत. दक्षिण कराडचे आमदार अतुलबाबाच होणार, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.