Ahmednagar Crime : केडगाव हादरलं! बायपास रोडवर गोळीबारात एकाचा मृत्यू
अहमदनगर : केडगाव पुन्हा एकदा हादरले आहे. केडगाव उपनगर परिसरातील बाह्यवळण रस्त्यावर काल (गुरुवारी) रात्रीच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. गोळीबाराच्या या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
शिवाजी किसन होले आणि अरुण नाथा शिंदे(नेप्ती) काल रात्रीच्या सुमारास एका बंद हॉटेलनजीक दारु पित बसले होते.
Kasba By Election : अक्षय गोडसेंचं स्पष्टीकरण, म्हणाले माझ्याकडे धंगेकरांचा नंबर सुद्धा नाही…
अचानक तीन जण त्या ठिकाणी येत तिघांनी होले आणि शिंदे यांच्यावर लुटण्याच्या उद्देशाने हल्ला केला. या तीन अज्ञात व्यक्तीने लूटीसाठी गोळीबार केला आहे. गोळीबारात शिवाजी होले यांचा जागीच मृत्यू झाला असून अरुण शिंदे जखमी झाले आहेत.
‘संस्कारी सून’ रुबिना दिसतेय भलतीच बोल्ड
या हल्ल्यादरम्यान शिंदे यांच्या खिशातील सात हजार रुपये हल्लेखोरांनी नेले असल्याची माहिती शिंदे यांनी पोलिसांनी दिली आहे. दोघेही जण अहमदनगर शहरापासून जवळच असलेल्या नेप्ती येथे राहत होते.
Kasba By Election : कसब्यातील मतदार हिंदुत्ववादी : फडणवीस यांनी केली मांडणी
दरम्यान, गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे घटनास्थळी दाखल झाले.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी पथके पाठविण्यात आली आहेत. या घटनेचा अधिक तपास कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी करीत आहेत.