75 वर्षांचे शाहू महाराज कोल्हापूरच्या शांतीसाठी उतरले मैदानात
Chhatrapati Shahu Maharaj On Kolhapur Riot : कोल्हापूर येथे आज शाहू महाराज छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. कोल्हापूर येथे काल संतप्त जमावाकडून दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज व अश्रूधाराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली होती. त्यासाठी कोल्हापूर भागातील इंटरनेट बंद करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. यापार्श्वभूमीवर शाहू महाराज छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी सर्व परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी गृह खात्याची असल्याचे त्यांनी म्हटले.
सामाजिक सलोखा ही कोल्हापूरची परंपरा आहे. 75 वर्षे आपल्या लोकशाहीला झाली आहेत. आता आपण नवीन युगात राहतो, 21 व्या शतकात राहतोय. आशा वेळेस आपल्या पूर्वजांच्या विचार आणि त्यांची शिकवणी आपल्या डोळ्या समोर असणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. तसेच यापूर्वी असे कधी झाले नव्हते. अशा प्रकारची दंगल होणं, हे कोल्हापूर शहराला शोभत नाही, असे मत शाहू महाराजांनी व्यक्त केले आहे.
या सर्व गोष्टीच्या मुळापर्यंत जाणे गरजेचे असून त्याचे कारण काय हे शोधणं गरजेचे आहे. या प्रकरणाकडे सायकॉलॉजी पद्धतीने पाहिले पाहिजे. सर्वांनी सामाजिक सलोख्याने राहिले पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सर्वात पहिले सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी शासनाची आणि गृहखात्याची असते, असे ते म्हणाले. त्यांनी या संबंधित सर्व रिपोर्ट घेतले पाहिजे आणि अशा घटना परत होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.
कोण पवार, असे म्हणणाऱ्या केंद्रीय मंत्र्याला रोहित पवार यांचे टोले…
संभाजीनगर, नाशिक, आता कोल्हापूर याचा अभ्यास करून याची लिंक आहे की, सर्व वेगवेगळ्या आहेत का? याकडे पाहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले. तसेच पोलिसांनी आता यापुढे सतर्क राहिले पाहिजे. प्रत्येकाने शांतता कायम राहील यासाठी प्रत्येकाने तसे वागले पाहिजे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांवर चालण्याची गरज आहे. लोकशाही मध्ये सुराज्य आणायचे असेल तर तसे सर्वांनी एकदिलाने राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.