ठाकरेंचे सरकार पडत होते, तेव्हाच महायुतीत जायचे होते; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

  • Written By: Published:
ठाकरेंचे सरकार पडत होते, तेव्हाच महायुतीत जायचे होते; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

कोल्हापूरः कोल्हापुरातील उत्तरदायित्व सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. काही जण आमची बदनामी करत आहेत. परंतु उद्धव ठाकरे सरकार पडत होते. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) सगळ्या मंत्र्यांनी, आमदारांनी एक पत्र तयार केले होते. ते आमच्या नेत्यांना दिले होते. तेव्हा महायुतीत जायचे होते, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे. मी बोलत आहे हे खोटे असेल, तर राजकारणातून निवृत्ती होईल. आहे कुणाची तयारी. खरे असेल तर जे खोटे बोलतात. त्यांनी राजकारणातून निवृत्त झाले पाहिजे, असे थेट चॅलेंजही अजित पवार यांनी दिले आहे. अजित पवार यांचा रोख हा थेट शरद पवारांकडेच होता.


…वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होती; छगन भुजबळांचा शरद पवारांवर निशाणा

अजित पवार म्हणाले, काही जण सांगतात, आमच्यावर दबाव होता. होय, आमच्यावर लोकांची कामे करायचा दबाव होता. अडीच वर्षांत सरकारमध्ये हाती घेतलेली कामे करण्याचा दबाव आहे. आमदारांच्या कामांना स्थगिती मिळाली होती. हे कामे सुरू करण्याचा आमच्यावर दबाव होता. पण इतर दबावाला भीक घालणारे आम्ही माणसे नाहीत. मी पण मराठ्यांची औलाद आहे. शेतकऱ्यांची औलाद आहे. दुसरा आमच्यावर दबावच असू शकत नाही, असा दावाही अजित पवारांनी केला आहे. एकनाथ शिंदेंबाबत, माझ्याबाबत काही बातम्या येत आहेत. त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

‘मुश्रीफांनी प्रेमाने मिठी मारली तरी बरगड्या राहणार नाही’; धनंजय मुंडेंचा रोख कोणावर?

आम्ही सत्तेत गेले आमचे काय चुकले आहे. विरोधी पक्षात असतो तर कामे झाली असती का ? स्वार्थ साधण्यासाठी महायुतीमध्ये सहभागी झालो आहेत. हातावर हात ठेवून घरी बसता येत नाही. नुसत्या गप्पा मारायच्या नसतात. संधी मिळाल्यानंतर लोकांची कामे केली पाहिजेत. त्यांच्यासाठी योजना आणल्या पाहिजेत. लोकहिताला प्राधान्य दिले पाहिजे, त्यासाठी महायुतीत आलो असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

आजही मी सहा वाजता कामाला सुरुवात करतो. त्यामुळेच महाराष्ट्राचा पाठिंबा आहे. मी लोकांसाठी कामे करत आहेत. पण काही जण दुषणे देत आहेत, असा टोलाही अजित पवारांनी लगावला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube