…वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होती; छगन भुजबळांचा शरद पवारांवर निशाणा

  • Written By: Published:
…वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होती; छगन भुजबळांचा शरद पवारांवर निशाणा

कोल्हापूर: कोल्हापुरातील अजित पवार गटाच्या उत्तरादायित्व सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. बीडच्या सभेत मी केवळ राजीनामा घेतल्याचे माझे दु:ख व्यक्त केले. त्यावरून मला दुशने देण्यात येत आहे. हमँ आह भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम, वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होती, असा टोलाही छगन भुजबळांनी लगावला आहे.

‘इंडिया’ ऐवजी भारत नावाला विरोध कोणाचा होता? शरद पवारांनी दिलं उत्तर

शरद पवारांवर बोलताना भुजबळ म्हणाले, आम्ही सत्तेत का गेलो? असे ते विचारतात. मला त्यांना इतिहासाची आठवण द्यायची आहे. या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होती. शरद पवार हे त्यांना गुरु मानतात. तेही इंदिरा काँग्रेसमधून बाहेर पडून सत्तेत सहभागी झाले होते. तेव्हा चव्हाण यांनी मला सत्तेची हाव नाही. मी समाजासाठी सत्तेत गेल्याचे म्हटले होते. आम्ही महाराष्ट्राच्या लोकांसाठी सत्तेत गेलो आहे. विकासासाठी सत्तेत सहभागी झालो आहे.

Maratha Reservation : ‘ओबीसी’मधून नको, आरक्षणाची मर्यादाच वाढवा; शरद पवारांनी सुचवला तोडगा

महात्मा फुले यांनीही सत्तेविना अवकळा झाली आहे, असे म्हटले आहे. सत्तेत सहभागी झाल्याशिवाय लोकांना न्याय देऊ शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्तेत गेल्याने ते संविधान देऊ शकले. तुम्हाला समतेचा न्याय देऊ शकले, असेही उदाहरणेही भुजबळ यांनी दिले आहे.

धनंजय मुंडे यांच्या बीडचे सभेत माझा राजीनामा घेतल्याबाबत मी बोलले. परंतु अनेकांनी त्यावरून माझ्यावर टीका सुरू केली आहे. आम्ही मनातील दुःखही मांडायची नाही का ? असा सवालही छगन भुजबळांनी उपस्थित केला आहे.

मराठा आरक्षणार भुजबळ म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. परंतु हे आरक्षण देताना दलित, ओबीसी यांच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे, याचा विचार केला पाहिजे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube