‘इंडिया’ ऐवजी भारत नावाला विरोध कोणाचा होता? शरद पवारांनी दिलं उत्तर

‘इंडिया’ ऐवजी भारत नावाला विरोध कोणाचा होता? शरद पवारांनी दिलं उत्तर

Sharad Pawar : उत्तर प्रदेशात ‘इंडिया’ ऐवजी भारत नावाचा ठराव एकमताने मंजूर झाला होता पण भाजपने विरोध केला असल्याचं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करीत भाजपवर हल्लाबोल चढवला आहे.

जसं जालियनवाला बाग काडं झालं, तसं ‘जालन्या’वाला घडवला; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात

शरद पवार म्हणाले, काही एक कारण नसताना भाजपने इंडिया ऐवजी भारत नावाचा मुद्दा उपस्थित केला आहे. कालच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका कार्यक्रमात भारत असं लिहिलं होतं. पण जेव्हा मुलायम सिंग यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तेव्हा विधानसभेत इंडिया ऐवजी भारत असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला होता, मात्र, एकच पक्षाने या ठरावाला विरोध केला होता, तो म्हणजे भारतीय जनता पार्टी पक्षाने विरोध केल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे.

‘करा किंवा मरा’ सामन्यात बांगलादेशसमोर माफक आव्हान, सदिरा समरविक्रमाची झंझावाती खेळी

तसेच उत्तर प्रदेशच्या ठरावाला विरोध करायचं काम ज्यांनी केलं तेच आज वेगळं वातावरण तयार करण्याचं काम करीत असून इंडिया किंवा भारत घटनेच्या पहिल्या वाक्यात यासंबंधी लिहिलं आहे, आज जे म्हणतात त्यांना जर प्रश्न विचारला की, तुम्ही इंडिया नावाने किती योजना काढल्यात? असा सवालही शरद पवार यांनी केला आहे.

नगरमध्ये राजकीय वातावरण तापलं! बाळासाहेब थोरात, रवींद्र धंगेकरांच्या उपस्थितीत ‘जनसंवाद यात्रा’

भाजपने स्टॅंडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया, अशा अनेक योजना काढल्या असून जर इंडिया ऐवजी भारत नाव केलं तर मुंबईस्थित गेट वे ऑफ इंडियाला काय म्हणायचं? असा खडा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. कारण नसताना सर्वसामान्य जनतेचं लक्ष विचलित करायचं हा दृष्टिकोन सत्ताधाऱ्यांचा असून मागील दोन दिवसांपासून याचं मुद्द्यावर चर्चा सुरु असल्याचं ते म्हणाले आहेत.

‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणं अशक्य, जाती-जातीत भांडण लावू नका’; पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या…

2024 साठी वातावरण तयार केलं जातंय :
आपल्या देशात आत्तापर्यंत दोन वेळा जी20 ची जागतिक परिषद पार पडल्या आहेत. माजी पंतप्रधान इंदिराजी असताना एक झाली होती त्यानंतर आता तिसऱ्यांदा भारतात ही परिषद पार पडत आहे. जेव्हा पहिल्यांदा जी20 परिषद पार पडली तेव्हा विदेशातून अनेक लोकं आले होते, पण आज जसं वातावरण तयार केलं जातंय, तसं वातावरण तेव्हा तयार करण्यात आलं नव्हतं. चांदीची, सोन्याची ताटं आणखीन काय काय? हे कधीच वाचण्यात आलेलं नव्हतं. विदेशातून लोकं येतात त्यांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्यच आहे, पण या निमित्ताने काही ठराविक लोकांचा मोठेपणा दाखवण्यासाठी सत्तेचा वापर कितपत योग्य आहे? याची चर्चा जनतेत होणार असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=rlwffoiEfxw

दरम्या , देशपातळीवरील महत्वाच्या प्रश्नांना बाजूला सारुन आपल्याला हवं तसं वातावरण तयार करुन 2024 च्या आगामी निवडणुकीसाठी हव्या त्या पद्धतीने पाऊल टाकून सामोरं जायंच हा त्यांचा उद्देश आहे. सर्वसामान्य नागरिकांचं हित, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, महागाई, याचं कुठलंही भान सत्ताधाऱ्यांना नाही हे लोकांना पटवून देणं माझं काम असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube