माढ्याचा पुढला खासदार काँग्रेसचाच! काँग्रेस नेत्याच्या दाव्याने राष्ट्रवादीत खळबळ

माढ्याचा पुढला खासदार काँग्रेसचाच! काँग्रेस नेत्याच्या दाव्याने राष्ट्रवादीत खळबळ

Prithviraj Chavan : देशात आता निवडणुकांचे वारे जोरात वाहण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. राज्यात महायुतीच्या नेतृत्वात 45 जागा निवडून आणण्याचं भाजपचं लक्ष्य आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही कंबर कसली आहे. जागावाटपाचं सूत्र ठरलेलं नाही, चर्चा सुरू असल्या तरी अंतिम निर्णय झालेला नाही. असे असतानाही काँग्रेसची (Congress) गाडी मात्र सुसाट निघाली आहे.

काँग्रेस निरीक्षक आणि वरिष्ठ नेते दौरे करत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. या मतदारसंघात आता काँग्रेसचाच खासदार असेल असे म्हणत चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या जागेवर दावा ठोकला आहे.

‘मी तर अजितदादांच्या स्वागतासाठी बुके घेतला होता’; राजकीय अतिक्रमणाच्या चर्चांना देसाईंचा फुलस्टॉप!

मतदारसंघातील माण, खटाव व फलटण विधानसभा मतदारसंघनिहाय प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक चव्हाण यांनी घेतली. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना तयारी सुरू करण्याचे आदेश दिले. भाजप खासदार निवडून आपण नुकसान करून घेतल्याची जाणीव इथल्या मतदारांना झाली आहे. मोदी सरकारमुळे देश आर्थिक संकटाकडे वाटचाल करतोय. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी राज्य सरकार बदल्यांमध्ये भ्रष्टाचार करत आहेत, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

लोकसभा निवडणुका जवळ आल्या असल्या तरी अद्याप तारखा जाहीर झालेल्या नाहीत. तयारी मात्र सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांकडून मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. प्राथमि बोलणीही सुरू आहेत. मात्र, जागावाटप अजून झालेले नाही. जागावाटपाचेही काही सूत्रही ठरलेले नाही. मागील काही दिवसांत राज्यात घडलेल्या घडामोडींमुळे सारीच गणित बदलली आहेत. कधी नव्हे ते महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष वरचढ ठरत आहे. काँग्रेसची ताकद जास्त दिसत असल्याने त्यांच्या नेत्यांनाही स्फुरण चढले आहे.त्यामुळेच त्यांच्याकडून मतदारसंघांवर दावेदारी केली जात आहे. नेत्यांच्या या दावेदारीमुळे महाविकास आघाडीत खटके उडण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.

काँग्रेसचं नगरी पॉलिटिक्स! दोन्ही मतदारसंघांवरील दावेदारीने ‘मविआ’ची वाढली धाकधूक

नगरच्या जागांवरही काँग्रेसचा दावा 

तसे पाहिले तर नगर दक्षिणेची जागा अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीच लढवत आहे. तर शिर्डी मतदारसंघ मागील तीन टर्मपासून शिवसेनेकडे आहे. असे असतानाही काँग्रेसने या जागांवर दावेदारी केल्याने वादावादी होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या दोन्ही जागांसाठी काँग्रेसने चाचपणी सुरू केली आहे. काँग्रेस राज्यात जास्तीत जास्त जागा लढविणार आहे. हे आधीच जाहीर करण्यात आले आहे. शिर्डी आणि नगर दक्षिण अशा दोन्ही ठिकाणी काँग्रेस निवडणूक लढणार आहे, असे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube