Nagar Crime: संग्राम जगताप म्हणाले, ‘प्रशासनाचा धाक नसल्याने गुन्हे वाढले’
मुंबई : अहमदनगर (Ahmednagar) शहरात प्रशासनाचा धाक उरलेला नाही. पोलीस खात्याचा धाक असेल तर गुन्हेगारी प्रवृत्तीला (Nagar Crime) आळा बसतो. यासाठी आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत. एक स्वतंत्र बैठक जिल्ह्याची लावावी आणि गुन्हेगारीला आळा घालावा, असे आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना सांगितले.
नगर शहरासह जिल्ह्यातील अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेत अनेक मुद्दे मांडले. या संदर्भात लेट्सअप मराठीशी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले, नगर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. यासाठी शहरातील पायाभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत अशी आमची भूमिका आहे. यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
Mohit Kamboj : ‘आईचे दूध प्यायला असेल तर…’ भास्कर जाधवांना पुन्हा डिवचले
माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यासाठी परिवहन खात्याकडील जागा मिळावी. तारकपूर बसस्थानक, माळीवाडी बसस्थानक आणि पुणे बसस्थानक यांचा विकास झाला पाहिजे अशी 2021 पासून आम्ही मागणी करीत आहोत. आज त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना लक्ष घालण्याची मागणी केली, असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात रस्ते आणि पर्याटनासाठी मंजूर झालेल्या निधीला नवीन सरकारने स्थगिती दिली होती. त्या कामांवरील स्थगिती उठवण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्याबाबद मुख्यमंत्री साकारात्मक असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.