एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकेंवर टीका! म्हणाले, यांची बाळासाहेबांना क्षमता माहिती होती म्हणून…

एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकेंवर टीका! म्हणाले, यांची बाळासाहेबांना क्षमता माहिती होती म्हणून…

Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray : शिवसेनेत बंड करून भाजपसोबत जात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर जोदार टीका केली आहे. सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत. यामध्येही त्यांनी ठाकरेंना लक्ष केलं आहे. उद्धट ठाकरेंच्या मनात मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती असं शिंदे म्हणाले आहेत. (Uddhav Thackeray ) ते नाशिकमध्ये (Nashik Lok Sabha) प्रचार सभेत बोलत होते.

 

गद्दारी करणारांना सहानुभूती नाही

अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या मनात मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा होती. परंतु, बाळासाहेबांनी हे कधी होऊ दिलं नाही, कारण त्यांना यांची क्षमता माहिती होती असा टोला शिंदे यांनी ठाकरेंना लगावला आहे. तसंच, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणारांना सहानुभूती मिळू शकत नाही असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

 

केवळ फोटो काढून चालत नाही

उद्धव ठाकरे यांना सत्तेचा मोह आहे असं म्हणत बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही सत्तेचा मोह झाला नाही. ते कायम किंगमेकरच्या भूमिकेत राहीले असंही शिंदे यावेळी म्हणाले. केवळ फोटो काढून राज्य चालवता येत नाही, हे बाळासाहेबांना माहिती होत असा टोलाही शिंदे यांनी लगावला आहे.

 

फेसबुक लाईव्ह करून घरात बसले

ठाकरे गटाला वाटत आपल्याला सहानुभूती आहे. परंतु, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दरी करणाऱ्यांना सहानुभूती भेटत नसते. लोकांना काम हवं असतं. तुम्ही लोकांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. परंतु, उद्धव ठाकरे केवळ फेसबुक लाईव्ह करून घरात बसले अशी टीका शिंदे यांनी यावेळी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज