सोलापूरः निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर अनेक जण नवस करतात. काही जण वेगळे निर्धार करतात. आपला नेता विजयी होईपर्यंत चप्पल घालणार, दाढी करणार नाही, असे अनेक जण आहेत. तसाच निर्धार पंढरपूरमधील एकाने केलाय. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्याची पत्नी विजयी झाली आहे. त्यामुळे तो आता तीन वर्षानंतर दाढी, डोक्याचे केस काढणार आहे. पंढरपूर तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला […]
नागपूर : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ९०० पेक्षा जास्त ठिकाणी विजय मिळवला असून महाविकास आघाडीच राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय जनता पक्षाचे विजयाचे दावे खोटारडे आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यातही भाजपाचा दारूण पराभव झाला असून गावखेड्यातील लोकांनी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाला सपशेल नाकारले आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रीया काँग्रेस […]
मुंबई : अभिनेत्री तेजस्विनी पंडित आपल्या अभिनयासह बोल्ड अंदाजाने प्रेक्षकांना नेहमीच घायाळ करत असते. मात्र आता तेजस्विनी पंडितने एक धक्कादायक खुलासा केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तीने आपल्या करिअरच्या सुरूवातीला आलेला एक अनुभव सांगितला की, आपल्या करिअरच्या सुरूवातीला ती पुण्यात एका फ्लॅटमध्ये राहत होती तो फ्लॅट एका नगरसेवकाचा होता. तेजस्विनी पंडितने हा धक्कादायक खुलासा करताना […]
अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ आमदार बबनराव पाचपुते यांना पराभवाचा धक्का बसलाय. त्यांचे पूत्र प्रतापसिंह यांचा पुतणे साजन पाचपुते यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव केलाय. त्यामुळे पाचपुते यांच्यासमोर राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बबनराव पाचपुते यांच्या राजकीय वाटचालीतील चाणक्य म्हणून त्यांचे भाऊ सदाशिव पाचपुते ओळखले जात होते. दोन वर्षांपूर्वी सदाशिव पाचपुते […]
अहमदनगर : आज झालेल्या ग्रामपंचायत मतमोजणीत आमदार शंकरराव गडाख गटाचे वर्चस्व पाहण्यास मिळाले. कांगोणी, भेंडे खुर्द व वडाळ्यात सत्तांतर झाले आहे. विशेष बाब म्हणजे या निवडणुकीत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे गटाच्या ताब्यात असलेल्या कांगोणीत गडाख गटाचा सरपंच निवडून आला आहे. येथे ११ पैकी ८ सदस्य मुरकुटे गटाचे निवडून आले आहेत. तर भेंडा येथे घुले + […]
सांगली : आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची एकतर्फी सत्ता आली आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री विजय झाल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या सातही जागांवर पडळकर समर्थक सदस्य विजयी झाले आहेत. तर सरपंचपदी गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर या ३०० मतांनी निवडून आल्या आहेत. जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची मतमोजणी सध्या सुरू आहे. आत्तापर्यंत […]