शास्त्री पंकजांना अहंकारी म्हणाले…पंकजांचेही जोरदार उत्तर

  • Written By: Published:
शास्त्री पंकजांना अहंकारी म्हणाले…पंकजांचेही जोरदार उत्तर

पाथर्डीतील भारजवाडी येथे नारळी सप्ताह पार पडला आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांचे कीर्तन होते. त्याला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि भाजप पंकजा मुंडे उपस्थित होते. तिघेही एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाली आहे. या तिघांचे मनोमिलन झाल्याचे बोलले जाते. पण त्यात जोरदार टीकाही झाली. महंत शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना अहंकारी म्हटले आहे. त्याला पंकजा मुंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

नामदेव शास्त्री व पंकजा मुंडेंची मने जुळली ! पंकजा आणि माझे वैर…

पंकजाताईचे आणि माझे काही वैर नाही, मी राजकारणी माणूसही नाही. तिला मी मुलगी म्हणून घोषित केले. तिच्याविरोधात मी कसा जाईल. पण तिच्या जवळचे काही जण हरामखोरपणा करतात. पंकजाताईने अहंकार कमी करावा व स्वाभिमान ठेवावा, आपण कोणाचे तरी ऐकले पाहिजे कोणाला तरी जीवनामध्ये मानले पाहिजे, असे नामदेव शास्त्री यांनी म्हटले आहे. शास्त्रींच्या काही शब्दामध्ये टोले होते तर काही शब्दांमध्ये आपुलकी होती.

उद्धव ठाकरे एवढा अहंकार बरा नव्हे… भाजपनं पुन्हा डिवचलं

त्याला पंकजा मुंडेंनी जोरदार प्रत्युतर दिले आहे. मी स्त्रीच्या शरीरातून जन्माला आले आहे. मी जोरात बोलते म्हणून मी अहंकारी वाटत आहे. काही लोक चुकीचे सांगत आहे. मी गडाबाबत कधीही वाईट बोलले नाही. महंत तुम्ही शिव्या दिल्या तरी ते माझ्यासाठी फुलेच आहे. तुम्ही जोड्याने मारले तरी त्या पादुकाच समजू. भगवानगड स्थापन केला असला तरी भगवान गडच श्रेष्ठ आहे. काहींनी लढाया लावून दिल्या आहेत, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube