पवार-विखेंच वैर संपणार? रोहित पवार आणि सुजय विखेंचे फोटो झळकले एकाच बॅनरवर

पवार-विखेंच वैर संपणार? रोहित पवार आणि सुजय विखेंचे फोटो झळकले एकाच बॅनरवर

Rohit Pawar Sujay Vikhe Banner : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील (Balasaheb Vikhe Patil) यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली नाही. नंतर अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील या पुढल्या पिढीतही कधी सूर जुळला नाही. मात्र, आता पवार आणि विखे यांच्या नातवंडांचे फोटो हे एकाच बॅनवर झळकले. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांचे फोटो एकाच बॅनरवर लागल्यानं नगरच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. (Photos of Rohit Pawar and Sujay Vikhe appeared on the same banner)

राज्याच्या राजकारणात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. कालचे विरोधक आज एकत्र आल्याचे चित्र आहे. जे नेते युतीत होते किंवा आघाडीत होते ते रातोरात विरोधात गेल्याचे मतदार पाहत आहेत. कोणता नेता कोणासोबत जाईल, काही सांगता येत नाही. त्यामुळे दोन वेगवेगळ्या पक्षांचे नेते एकत्र आले तरी अनेकांच्या भुवया उंचावतात. अशा स्थितीत दोन राजकीय विरोधकांचे एकत्र फोटो असलेल्या बॅनरची चर्चा सुरू झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात विखे आणि पवार कुटुंबातील राजकीय वैर सर्वांनाच ठाऊक आहे. सुजय विखे यांनी भाजपचे खासदार झाल्यानंतर जामखेड मतदार संघात येऊन रोहित पवार यांच्यावर टीका केली. तर रोहित पवारही वेळोवेळी भाजपवर निशाणा साधत असतात, अनेकदा त्यांनी खासदार सुजय विखे पाटील यांच्यावरही टीका केली. मात्र, या राजकीय टीकाटिप्पणीमध्ये कर्जत तालुक्यातील खेड गावातील एक फलक सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

किंग खानच्या ‘Jawan’ सिनेमाची क्लिप चोरीला; मुंबई पोलिसात एफआयआर दाखल, वाचा प्रकरण? 

खेड गावातील बॅनर्सवर सुजय विखे आणि रोहित पवार यांची छायाचित्रे आहेत. रोहित पवार यांनी गावाच्या विकासासाठी 10 लाख, तर सुजय विखे पाटील यांनी 12 लाख दिले. त्यामुळे गावकऱ्यांनी या दोघांचे अभिनंदन करणारे फलक लावले आहेत. दोघांचे फोटो एकाच बॅनरवर लागल्यानं सध्या हा चर्चेचा विषय झाला आहे.

खरंतर राजकीय नेते हे विकासकामांच्या श्रेयवादावरून अनेकदा भांडतांना दिसतात. मात्र, सुजय विखे आणि रोहित पवार या दोन्ही युवा नेत्यांनी सामंज्यस्याने गावाच्या विकासासाठी आर्थिक मदत केली. त्यांच्यात यावेळी लढाई इथं दिसली नाही. त्यामुळं आता पवार-विखे वादाचा अंक संपणार का, आणि हे दोन्ही नेते जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येणार का? हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube