हा तर राजकीय दुश्मनी काढण्याचा प्रकार, शेवगाव दंगल प्रकरणावर आंबेडकरांचा आरोप

हा तर राजकीय दुश्मनी काढण्याचा प्रकार, शेवगाव दंगल प्रकरणावर आंबेडकरांचा आरोप

Prakash Ambedkar News : शेवगावची दंगल म्हणजे राजकीय दुश्मनी काढण्याचा प्रकार असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. दरम्यान, शेवगाव दंगल प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांना गोवण्यात आल्याचं समोर आलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत काही समाजकंटकांकडून दंगल घडवून आणण्यात आली. या प्रकरणात राजकीय दुश्मनी काढण्यासाठीच राजकीय नेत्यांची नावे गोवण्यात आल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे. (prakash ambedkar speak on Shevgaon riots)

Wrestlers Protest : आंदोलन मागे घेतलेले नाही; खोट्या बातम्यांमध्ये रेसलर्सचे समोर आले स्टेटमेंट

शेवगावमध्ये ज्या दिवशी दंगलीचा प्रकार घडला होता, त्यावेळी वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष किसन चव्हाण हे औरंगाबादेत आयोजित कार्यक्रमात होते. औरंगाबादेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी चव्हाण हे औरंगाबादेत होते. त्यामुळे त्यांचा या घटनेशी काही एक संबंध नसल्याचे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.

Ahmednagar News : मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो घेऊन तरुणांचा धिंगाणा…

तसेच अशा घटनांमुळे राजकीय दुश्मनी काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. जे लोकं या दंगल प्रकरणात होतेत त्यांच्याविरोधात कारवाई झाली पाहिजे, मात्र निरपराध व्यक्तींवर राजकीय आकसापोटी दंगलीचे गुन्हे दाखल करु नये, जेणेकरुन तरुण कार्यकर्त्यांचे भवितव्य धोक्यात येणार नाही, अशा घटना जाणीवपूर्वक घडवल्या जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांत, शिर्डीसाठी महसूलमंत्र्यांनीं दिले 52 कोटी

निवडणुका जवळ आल्या की अशा घटना होण्याचं प्रमाण वाढतं, तरुणांना अनेक ठिकाणी नोकरीसाठी अन्य कामांसाठी पोलिसांकडून चारित्र्य प्रमाणपत्र घ्यावं लागतं. जर त्या कार्यकर्त्यांचे नाव कुठल्या गुन्ह्यामध्ये जाणीवपूर्वक टाकलेले असेल तर याचे आयुष्य बरबाद होते. किसन चव्हाण यांच्या अटक पूर्व जामीनाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पोलिसांच्यावतीने अटकपूर्व जामीन अर्जावर आपले म्हणणे कोर्टात दाखल करावे, त्यानंतर कोर्ट जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, या दंगलीप्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली आहे. यावेळी वंचितचे अॅड. दिपक श्यामदिरे, भटके विमुक्त आघाडीचे विष्णू जाधव, प्रभाकर बकले, नितीन सोनवणे, पुरुषोत्तम वीर, बालाजी जगतकर, कुणाल सरोदे, संजय चव्हाण, प्रतिक बारसे, योगेश साठे, रविंद्र म्हस्के, जीवन पारधे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube